नवीन लेखन...

सुगंधाचे पुजारी (कथा)

मुंबईत राहणाऱ्या माणसाला काही वास येत असेल यावर माझा विश्वास नाही. चोवीस तास फॅक्टरीतलं प्रदुषण, चमत्कारिक वासाचे विषारी वायू, टनानं साठणारा कचरा, प्रचंड आकाराच्या दाट लोकवस्त्या, दलदल, चिखल, अपुऱ्या सोई यामुळे सकाळी उठल्यापासून झोपी जाईपर्यंत दुर्गंधीचं सदोदित आक्रमण होतच असतं.


काळच्या धावपळीत केव्हा एकद घर सोडून स्टेशनवर पोहोचून, तुडुंब भरलेल्या गाडीत कसंबसं आत शिरुन ऑफिसात वेळेवर कस पोचता येईल, या विचारात असतो. त्यामुळे येताना स्टेशनच्या बाहेर फारसं लक्ष द्यायला कुणालाही वेळ नसतो. आसपासचं काही दिसत नाही. कुणी भेटत नाही. कुणी दिसल तरी काय, कस काय? असं चालता चालता विचारुन पुढे सरकत असतो. उभं राहून बोलायला कुणाला फारसा वेळच नसतो. एकच विचार असतो. मिळेल ती गाडी पकडणं.

संध्याकाळी घरी परत जाताना माणूस थोडा रेंगाळत जातो. घरी पोचायला पाच-दहा मिनिट उशीर झाला तर चालण्यासारखं असतं. जाता जाता किरकोळ खरेदीही होते. त्यामुळे संध्याकाळी स्टेशनबाहेर जी काही गर्दी असते ती अफाटच असते. सकाळची लगबग  फारशी दिसत नाही. सकाळी जाताना फक्त पेपर विकणाऱ्या मुलांचाच आवाज तेवढा ऐकू येतो. संध्याकाळी संपूर्ण बाजारच अंगावर येतो. त-हेत-हेचे फेरीवाले आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी जोरजोरात ओरडत असतात. चालणाराही हळूहळू थबकतच रिक्षा स्टॅण्ड किंवा बस स्टॉपकडे सरकत असतो.

सकाळी जाताना ते जाणवत नाही, पण संध्याकाळी काम संपवून परततान हमखास थांबाव, असं वाटायला लावणारे दोन फेरीवाले मला दिसतात. त्यांच्याकडून मी नेहमीच काही घेतो असे नाही. पण चालताना किंचित थबकतो. किती वाजलेत ते घडयाळात पाहतो आणि पुढे जातो. ही मंडळी समोर दिसली की, क्षणभर थांबून घडयाळात बघून पुढे जायची सवयच जडली आहे.

ते दोघंही लांबवरुन ओळखता येतात. दिसण्यापूर्वीच ते आपल्या जागी अहेत हे लांबवरुनही जाणवतं. सुगंधाच्या साम्राज्यात वावरणारे हे दोघ आहेत कुठे, हे वाऱ्याची झुळूक आपल्याला सांगत असते.

परतताना आपण प्लॅटफॉर्मवर एकदा फेकलो गेलो की बाहेर पडताना जिन्याची पहिली पायरी चढल्यावरच, कारण नेहमीच्या सवयीनं काही तरी फरक जाणवतो. जिन्याच्या वरच्या बाजूला पायरीवर उभा असतो- सुगंधी अगरबत्तीवला. इतर फरीवाल्यांसारख ओरडण्याचे त्याला कारण नसावं. हातात चार-पाच पेटत्या अगरबत्त्या घेऊन कर्मयोग्यासारखा एका पायावर उभा असलेला मला अगरबत्तीवाला खरा अग्निहोत्री वाटतो. दिवसात किती अगरबत्त्या जाळत असेल आणि किती विकत असेल कुणास ठाऊक. सकाळी नसतो. डोळयांनी दिसत नहाी. हाताला अडकवलेल्या कापडी पिशवीत पाच-पंचवीस अगरबत्त्यांच पुडकं खालीवर करत उभा असतो. मला आठवत तेव्हापासून तो असाच उभा आहे.

त्याच्याकडून कधी काही विकत घेतल नाही. पण न मागता माझ्याप्रमाणच असंख्य नगरवासीयांना त्याच सुवासिक उद्बत्तीने एका उदात्त जगात नेल आहे. एक शब्दही  न बोलणारा हा उदबत्तीवाला मला तरी महाकाय लोकलची पूजा करणारा, येणाऱ्या-जाणाऱ्यांना सुखरुप आणून सोड, अशी मूक प्रार्थना करणारा, एरवी रुक्ष वाटणाऱ्या स्टेशनला प्रार्थना मंदिराचं गांभीर्य सहजपणे देणारा पुजारीच वाटतो.

असा हा पुजारी मुंबईतल्या प्रत्येक स्टेशनच्या डाव्या-उजव्या हाताला उभा असतो. त्याला चुकवून कुणी जाऊ शकत नाही.

आडखळत, चाचपडत एकदा बाहरे पडल, की स्टेशनबाहेरचे फेरीवाले अंगावर येतात. कान फुटेपर्यंत त्यांच ओरडणं थांबत नाही. प्रत्येक जण आपली जागा अडवून बसलेला असतो. वर्षनुवर्ष त्याच रस्त्यांवरुन जातानाही बिननावाची माणसं ओळखीची झालेली असतात, त्यांच्या कडून काहीही विकत न घेता.

चार पावल चालल की ताज्या फुलांचा घमघमाट स्वागत करतो. दिवसभराचा थकवा क्षणात दूर करायला दुसरं काही चांगल साधन असावं असं वाटत नाही. दोन-तीन फुलवाले नेहमीची फुल घेऊन सजवून बसलेले असतात. सुवासापेक्षा डोळयात भरणारी फुलच जास्त असतात. त्यांच्यापासून जरा  बाजूला येणाऱ्या-जाणाऱ्या रिक्षा, माणंस यांचे धक्के चुकवत चार-पाच मुली फुल घेऊन बसलेल्या असतात. पांढरं आणि काही रंगीत फुल एकत्र गुंफून लांबलचक हार तयार केलेला असतो आणि तो हाताने मोजून, ब्लेडनं कापून गोल गुंडाळून दिला  जातो. या फुलांना काही वेगळाच वास असतो. एक किडकिडीत उंच मुलगी कायम आपल्या हाताने माळेची लांबी मोजत असते. तिचा हात लांब असल्याने जास्त लांबीची फुलांची माळ पदरी पडेल अस वाटून तिच्याकडे गर्दी असते. या फुलराण्यांची भाषा तामिळ किंवा मल्याळी असावी. त्यामुळे त्यांही काही बोलत नाहीत. हातातली फुलं पुढे करतात आणि फुलाना बोलायला शब्द लागत नाही. एक नवा पैसा न घेता या मुली सुगंधाची लयलूट करत असतात.

मुंबईत राहणाऱ्या माणसाला काही वास येत असेल यावर माझा विश्वास नाही. चौवीस तास फॅक्टरीतल प्रदुषण, चमत्कारिक वासाचे विषारी वायू, टनानं साठणारा कचरा, प्रचंड आकाराच्या दाट लोकवस्त्या, दलदल, चिखल, अपुऱ्या सोई यामुळे सकाळी उठल्यापासून झोपी जाईपर्यंत दुर्गंधीच सदोदित आक्रमण होंतच असत. त्यात जीवघेण्या घामाची भर पडलेली असते. अशा वेळी सुगंधाची एक झळूकसुध्दा खूपच दिलासा देऊन जाते.

शोभेची फुल विकणाऱ्या दुकानांपुढे थांबण्यापेक्षा सुवासिक ताजी फुल विकणाऱ्या फुलवाल्यांकडून हात दोन हात प्रसन्नता घ्यायला काहीच हरकत वाटत नाही.

——————————————————————————

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : 27 जानेवारी 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..