सुगंध पसरे चारही दिशा,
मधुसंचयाचा करत साठा, फुलाफुलांवर बहर केवढा,
वारा वाही, सुवास खासा,–!!!
फांदी फांदी डंवरून येई, फुलाफुलांनी लगडतसे,
किमया सारी निसर्गाची,
तोरणे सतत लावत असे,–!!!
जंगी असे स्वागत एवढे,
खास चालले कुणासाठी,
कोण कोणासाठी झुरे,-
-कोण अवतरे पृथ्वीवरती,—?
सडा पडतो खाली फुलांचा,
का घातल्या पायघड्या,
रंगांची अशी मांदियाळी,
अत्तराचे कोण शिंपी सडे,–!!!
कोमल, मऊ, तरल, तलम, पाकळ्यांचे जादू कशी बोले, हळूहळू पहा उमलत,
फूल झाडावर डोले,–!!!
पानोपानी रंगरंगोटी,
मधूनच कळी डोकावते,
सूर्यकिरणांशी होड चालली,
हळूच खोडाला बिलगे ,–!!!
फुलाफुलांवर रेंगाळत,
भुंगे खेळत राहती,
प्रणायक्रिडा त्यांच्या बघुनी लतावेली गाली हसती,–!!!
भ्रमरांच्या त्या प्रेमलीला,
पाहून त्या रोमांचित होती,
हळूच कवटाळती झाडा,
प्रियकर ना तो शेवटी,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply