जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या.
वयाच्या सोळाव्या वर्षी ‘भुवन शोमा’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी ‘भूवन शामा’ या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक ठिकाणी तिची उपस्थिती जाणवते. त्यानंतर अभिनय करण्याऐवजी कॅनडात गेल्या आणि कृषी अध्ययन करण्याचा निर्णय घेतला. अॅग्रीकल्चरमध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर भारतात परतून शेतक-यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतात परतल्यानंतर हे काम जुळून आले नाही. मग मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन दुरदर्शनवर काही दिवस काम केले. मात्र येथेही मन न रमल्यामुळे लवकरच राजीनामा दिला. त्यांनी अनेक डॉक्युमेंट्रीसुद्धा बनवल्या आहेत. सुहासिनी मुळे यांनी गुलजार यांच्या ‘हुतुतु’ या सिनेमात अभिनय केला होता. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आशुतोष गोवारिकर यांच्या ‘लगान’मध्ये आमिर खानच्या आईची भूमिका केली होती. त्यांनी ‘दिल चाहता है’ या चित्रपटात काम केले होते. सुहासिनी मुळे यांनी ‘जोधा अकबर’,’बिग ब्रदर’, ‘पेज 3’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘लव’ ,’भुवन शोम’ या या सिनेमांमध्ये काम केले. टीव्हीवर ‘देवों के देव…महादेव’, ‘विरासत’, ‘देश की बेटी नंदिनी’ आणि ‘एवरेस्ट’ या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी ४ वेळा डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे एकटी घालवल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुर्टु यांच्यासोबत लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply