तप्त लोखंडात, लपली ती आग
दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग…१,
सुंदर फूलात, सुंगध तो छान
अवती भवती काटे, ते कठीण…२,
विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,
सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
न दिसे ती आम्हा, असे मोह माया…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply