सुखाला माहीत नसते
दुःखाचे दुःखद उमाळे
अर्थाला माहीत नसते
अनर्थाचे घातक सोसणे
शब्दांना माहीत नसते
वाक्यांचे अर्थ सारे
वाक्यांना माहीत नसते
शब्दांचे भाव सारे
प्रेमाला माहीत नसते
मायेचे पड वेगळे
मायेला माहीत नसते
प्रेमाचे आंधळे वागणे
सुराला माहीत नसते
लयाचे बोल न्यारे
लयाला माहीत नसते
सुराचे स्वर सारे वेगळे
आनंदाला माहीत नसते
वाईटाचे दिवस वेगळे
वाईटाला माहीत नसते
आनंदाचे हसणे आगळे
डोळ्यांना माहीत नसते
पापण्यांचे अश्रू खारे
पापण्यांना माहीत नसते
डोळ्यांचे ओल हळवे भिजणे
पुरुषाला माहीत नसते
स्त्रीचे मन नाजूकसे
स्त्रीला माहीत नसते
पुरुषाचे भाव तरंग वेगळे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply