सुखात येऊ दे स्मरण,
दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत,
तुझा हात नित्य मिळे,,—
पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे,
प्रार्थित, पूजित तुला सदैव,
त्राता म्हणुनी भाकावे,–!!!
तूच बंधू ,तूच सखा,
तूच रक्षक आमुचा,
विधाता म्हणत म्हणत,
दावा करते मी साचा,–!!!
हे गुरु, हे माय बापां,
लौकिक या सुखदुःखात,
दूर करशी अशा व्यापातापा,–
आमुचा तसा तू पाठीराखा–!!!
पाप-पुण्याचे हिशोब,
कर्म शेवट फळ देते,
जसे ज्याचे असते कर्म,
तशी मनुष्यजात भोगते,–!!!
सद्भावना, आचार-विचार, माणुसकीही कृतिशील होते, अहिंसेच्या पडद्याआड,
शाब्दिक हिंसा सारखी घडते,–!!!
वास्तू देते आशीर्वाद,
तथास्तू सारखी म्हणते,
आई बापात पहावा ईश्वर,
ती तशीच साक्ष देते,–!!!
कलहांमाजि ठेवले काय, कोणासही ना कळते,
विधात्याचे विधीलिखित,
मग कामास लागते,–!!!
सत्ता, स्वार्थ, पैसा, अहम,
जगण्याची झाली सूत्रे,
काय आहे तुमच्या हातात ,
कळून येईल क्षणमात्रे ,—!!!
पाऊस, ओला दुष्काळ, पूर, परमेश्वराची किती साधने,
जागा नाही होत माणूस,
जाणत आपुली दुष्कर्मे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply