आजपासून एक नवीन लेखमाला सुरु करत आहोत. लेखमालेचे नाव आहे ‘सुमंत उवाच’.
सुमंत परचुरे यांच्या लेखणीतून साकारलेली ही लेखमालिका आपल्याला नक्कीच आवडेल.
सुमंत उवाच म्हणजे नक्की काय? हे लिखाण कशासाठी? यातून घ्यायचे काय?
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. अध्यात्म म्हणजे काय? अध्ययनातून आत्म्याशी साधलेला संवाद म्हणजे अध्यात्म. पण समर्थांनी अध्यात्माची जोड घेऊन माणसाला मिळालेला हा मनुष्यजन्म सार्थकी कसा लावता येईल हे सांगितले आहे.
सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे असे लेखकाला वाटते. सुमंत उवाच मधे अध्यात्मिक, सामाजिक, नैतिक, व्यावसायिक आणि अशा अनेक विषयांना समजून कसं घ्यायचं आणि त्याचा उपयोग आयुष्य जगताना कसा करायचा यावर भाष्य केले आहे.
ओवीबद्ध असलेले शब्द स्वरचित आहेत तर त्याचा अर्थ हा सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखकाविषयी:
Leave a Reply