नवीन लेखन...

आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ  सुमती मुटाटकर

हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ  सुमती मुटाटकर यांचा स्मृतिदिन. यांचा जन्म दि. १० सप्टेंबर १९१६ रोजी झाला.

सुमती मुटाटकर या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ, तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या. सुमतीबाईंनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत विषयांतील शिक्षण विविध गुरूंकडून प्राप्त केले. ग्वाल्हेर घराण्याचे पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर व पंडित राजाभैय्या पूंछवाले, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसैन खान, पंडित अनंत मनोहर जोशी आणि रामपूर घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसैन खान यांच्याकडे त्यांनी आपले संगीत शिक्षण घेतले. त्या पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थेतही शिकत होत्या. १९५३ मध्ये त्यांनी आकाशवाणीच्या (ऑल इंडिया रेडियो) संगीत विभागाच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली व नंतर त्या संगीत विभागाच्या उप-मुख्य निर्मात्या म्हणूनही काम बघू लागल्या. १९६८ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठातील संगीत व कला विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. १९८१ च्या सप्टेंबर मध्ये त्या विभागाच्या प्रमुखपदावरून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तेथील कारकीर्दीत त्यांनी संगीत क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्पांना हाताळले, तसेच त्या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. १९७९ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपने गौरविण्यात आले. १९९९ मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांना मध्य प्रदेश शासनाने २००१ – २००२ चा ‘कालिदास सन्मान’ देऊन त्यांचा गौरव केला होता. सुमती मुटाटकर यांचे २८ फेब्रुवारी २००७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..