आपल्या सर्वांना सुनंदन लेले हे एक क्रीडा समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत क्रिकेट खेळाकरिता आपल्या लिखाणातून खूप मोठे योगदान दिले आहे. आपल्यातील अनेकांना सुनंदन लेले हे सुद्धा एक क्रिकेटर होते हि गोष्ट माहिती नसेल. महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेले व क्रिकेट हा ब्लड ग्रुप असलेल्या सुनंदन लेले हे पक्के पुणेकर.
सुनंदन लेले यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण रमणबाग व नुमवी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण बी.एम.सी.सी.येथे झाले. त्यांनी सिंबायोसिस मधून एमबीए केले आहे.
सुनंदन लेले यांनी लहान असताना पुण्यातील वाड्यामधूनच खेळायला सुरवात केली होती. शाळेत असताना ते नुमवी कडून, बी.एम.सी.सी.त शिक्षण घेत असताना कॉलेज कडून पुढे पीवायसी कडून क्रिकेट खेळले व पुढे सुनंदन लेले हे महाराष्ट्र संघाचे अंडर १९ चे कॅप्टन राहिलेले आहेत. ते एक उत्कृष्ट फलंदाज होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप क्रिकेट खेळले आहेत. महेंद्रसिंग धोनी सोबत त्यांनी ओपनिंग पण केले आहे.
सुनंदन लेले यांनी पहिली नोकरी ती केसरी पेपर मध्ये पुढे काही काळ षटकार मध्ये. सुनंदन लेले १९८६ पासून क्रीडा पत्रकारितेत आहेत. काही काळ आयबीएन – लोकमतचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर म्हणून काम केलेले सुनंदन लेले आता फ्री लान्स क्रीडा पत्रकार म्हणून काम करतात. सुनंदन लेले यांनी अनेक वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेट खेळणाऱ्या जवळजवळ प्रत्येक देशाचा दौरा केलाय.
सुनंदन लेले यांची www.sunandanlele.com या नावाने वेब साईट असून आपल्या सगळया दौऱ्यात आलेले अनुभव या साईटमध्ये आहेत.. भरपूर चित्रं, काही एक्सक्लुजिव्ह व्हिडिओ आणि सगळ्या देशात लेले यांना भेटलेली कलंदर माणसं या वेबसाईटमध्ये लेले यांनी बंदिस्त केलीत… सचिन तेंडुलकर सुनंदन लेले यांचा आवडता क्रिकेटर.. त्याच्याविषयी छोटं पुस्तक निघेल एवढे लेख या साईटवर आहेत. सचिनचेच नाही तर सगळ्याच भारतीय क्रिकेटर्सवर लेलेंनी लिहिलेले लेख आणि त्यांचे दुर्मीळ फोटो तुम्हाला इथं दिसतील.. आणि दुर्मीळ व्हिडिओही.. या साईटचं वेगळेपण म्हणजे क्रिकेट कव्हर करता करता वेगवेगळ्या देशात आलेले अनुभव आणि तिथं भेटलेली क्रिकेट बाहेरची माणसं यांवरचे लेखही या साईटवर आहेत. सुनंदन लेले यांच्या पत्नी मंजिरी लेले याही खेळाडू असून त्या नॅशनल हॉकी खेळल्या आहेत.
क्रिकेट सामन्यांच्या वार्तांकनाबरोबर लेलेंनी केलेल्या भटकंतीच्या बारा गावचं पाणी, कांगारू ही’ पुस्तके लिहिली आहे. यात काही लेख व्यक्तिचित्रणात्मक आहेत, तर काही स्थळांची माहिती देणारे आहेत. केवळ प्रवासवर्णनपर पुस्तक, असे या पुस्तकाचे स्वरूप नाही. लेले यांच्या लेखणीला त्यांनीच काढलेल्या सुंदर छायाचित्राचीही जोड आहे.हर्षा भोगले + विक्रम साठ्ये + सुनंदन लेले यांचा ‘दे धमाल क्रिकेट गप्पा’ हा कार्यक्रम यु ट्यूब वर नुकताच चालू झाला आहे. तसेच इंटरनॅशनल बकासुर हा त्यांचा यु ट्यूब चॅनल असून या वर अनेक हॉटेलची माहिती दिली आहे.
International Bakasur
सुनंदन लेले यांची मुलाखत. https://www.youtube.com/watch?v=O5RMvzctaR4
-संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता
Leave a Reply