नवीन लेखन...

सनग्लासेस

सनग्लासेस म्हणजे गॉगल हे सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन आहे. प्रदूषणापासूनही त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. सनग्लासेसमुळे स्त्री-पुरूषांचे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते. अ अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून (यूव्ही) डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टरही विशेष करून उन्हाळ्यात सनग्लासेस वापरण्याचा सल्ला देतात.

असे असले तरी सनग्लासेस हे चांगल्या दर्जाचे वापरणे गरजेचे असते. सनग्लासेसमध्ये टिंटेड, रिफ्लेक्टिव्ह, फोटोक्रोमॅटिक, पोलरायझिंह असे प्रकार असतात. गॉगलची फ्रेम व आकार पाहणे महत्त्वाचे असते. स्वस्तातील गॉगल घेण्यापेक्षा चांगल्या कंपनीने उत्पादित केलेला गॉगल वापरणे केव्हाही चांगले असते.

प्रकाश लहरींची तरंगलांबी जेवढी कमी तेवढी त्यांच्यातील ऊर्जा जास्त असते. अतिनील किरणांमुळे कॉर्निआ व रेटिना या डोळ्यांच्या दोन्ही भागांना इजा होऊ शकते. घरातील प्रकाश हा ४००-६०० ल्युमेन असतो, जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ही तीव्रता १००० ल्युमेन असते. हायवेवर हे प्रमाण ६००० ल्युमेनपर्यंत असते. आपल्या डोळ्यांना प्रकाशाची तीव्रता ३५०० ल्युमेनपर्यंतच सोसते. त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा प्रकाश शोषला जात नाही. त्यामुळे पांढरे पट्टे दिसू लागतात त्याला ग्लेअर असे म्हणतात. बर्फावर सूर्यप्रकाश पडला तर १२००० ल्युमेन्सचा प्रकाश दिसतो त्यामुळे स्नोब्लाइंडनेस येतो.

टिंट ग्लासमध्ये जो रंग असतो त्यामुळे प्रकाशातील कुठल्या रंगाचा प्रकाश काच शोषणार ते अवलंबून असते. ग्रे, यलो (गोल्ड), अंबर (ब्राऊनिश), ग्रीन, पर्पल किंवा रोझ असे प्रकार यात आहेत. अंबर रंगाच्या टिंटमध्ये उच्च तरंगलांबीचे रंग शोषले जातात. ग्लेअर कमी करणे व अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण अशा दोन्ही गोष्टी यात साध्य होतात. सन टायगरने तर ब्लू ब्लॉकर्स सनग्लासेसचे पेटंट घेतले आहे. सनग्लासेसमुळे काही प्रकाश परावर्तित केला जातो, तर काही स्वीकारला जातो. अल्ट्राव्हायोलेट किरण रोखणाऱ्या सनग्लासेसच्या काचेवर एका विशिष्ट रसायनाचा थर असतो.

साधारण ४०० नॅनो मीटर तरंगलांबीचे अतिनील किरण रोखणाऱ्या सनग्लासेसवर यूव्ही-४०० असे लिहिलेले असते तेच वापरावेत. सनग्लासेसची फ्रेम नायलॉनची असलेली चांगली मेटल फ्रेम लगेच खराब होते व जडही असते. फ्रेमलेस सनग्लासही उपलब्ध असतात. ब्लॅक फ्लाय, बोले, कोस्टा डेलमार, आयहॉक, रेव्हो, सेक्स व्हिजन, सन टायगर, सेरेनगेटी, ओकले, नेटिव्ह आयवेअर, रे बन अशा सनग्लासच्या अनेक नामांकित कंपन्या आहेत. जेम्स ऐसकफ यांनी १८ व्या शतकात गॉगलची भिंगे बनवली होती. त्यानंतर अमेरिकेत सॅम फोस्टर यांनी १९२९ मध्ये सनग्लासेसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले. पोलराईज्ड सनग्लासेसचा शोध एडविन एच.लँड यांनी लावला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..