डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु नाक तोंड डोळे त्यामानाने लहान होते. जन्मत: हा दोष त्या मुलामध्ये असल्याचे त्यांना कळले. त्यांचे ज्ञान व शोधक बुद्धी त्यांना शांत बसू देईना. त्याकाळी वैद्यकीय शास्त्र फार प्रगत नव्हते. आधुनिक उपकरणे, यंत्रे उपलब्ध नव्हती. विचार आणि तर्क ह्यावर जास्त भरवसा होता. ते त्या बालकावर त्याच्या रोगाची काय कारणे असतील, ह्यावर प्रत्येक अंगाने टिपणी करू लागले. आपला बराचसा वेळ ते त्या बालक व त्याच्या रोगावर केंद्रित करू लागले.
त्या बालकाच्या मेंदू व मेंदूच्या सभोवताली असलेल्या द्रवाचे ( cerebro spinal fluid ) प्रमाण त्या रोगांत बरेच वाढलेले त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर त्या द्रवाने मेंदूवर व इतर अवयवावर एक दाब निर्माण केलेला त्यांना कळले. त्यांनी त्या विकाराचे नांव Hydro Cephalus असे ठेवले. अशाच केसेसवर ते लक्ष केंद्रित करू लागले. त्यावरचे आजही मान्यता पावलेले उपचार त्यांनी सुचविले होते.
ह्याच Hydro -Cephalus विषयांत एक गमतीदार निरीक्षण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बालकाच्या डोळ्याचे खूप बारकाईने पाहणी केली. जेंव्हा कोणतेही मूल आपले डोळे पूर्ण उघडते, म्हणजे डोळ्याच्या पापण्या उघडलेल्या असतात, डोळ्याचा मध्य काळा भाग, ज्याला Cornia म्हणतात व सभोवताली पांढरा भाग ज्याला Sclera म्हणतात तो दिसतो. काळा भाग गोलाकार असून मध्यभागी असतो व इतर भाग पांढरा असतो. ह्या विकारांत मधला भाग काळा असलेला अर्ध गोलाकार असा दिसतो. ह्याचे कारण मेंदूतील वाढलेल्या द्रवाचा दाब हा डोळ्याच्या बुबुळावर पडून ती पुढे सरकतात. फिरली जातात. आणि ती काळी टिकी Cornia अर्ध गोलाकार बनत तशी दिसू लागते. त्यांनी त्यांच्या निरीक्षणाला मावळत्या सूर्याची उपमा दिली. The Cornia and slera around look like Sun -Set Appearance असे त्यांनी त्याचे प्रथम वर्णन नोंदविले.
तेंव्हा पासूनच अशा विकारामधली डोळ्यामध्ये होणाऱ्या बदलला कायमचे Sun -Set Appearence हेच नांव पडले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply