ज्वारी व बाजरी या धान्याला अमेरिकेने नाईलाजाने का होईना सुपर फुड म्हणून मान्यता दिली आहे.2023 हे वर्ष जग जागतिक भरड धान्य milet वर्ष म्हणून साजरे करीत आहे…ज्वारी बाजरी ही धान्ये आपण सिंधुसंकृती पासून आपल्या आहारात वापरत आहोत..
ही धान्ये केवळ मानवी आरोग्या साठी नव्हे तर निसर्ग पूरक देखील आहेत.कमी पाण्यावर आणि दुष्काळात देखील ही पीके तग धरू शकतात… ऊस आणि मका पिके ही निसर्ग हानिकारक आहेत हे जग मान्य करू लागले आहे…
सुपर फुड चे मानांकन जाहीर करताना त्यात भारतीय वंशाच्या गावरान गाईंच्या दुधाचा मात्र समावेश नाही…
खूप लांबचा काळ नाही मी कॉलेजला असताना माझी आई चुलीवर हारात दुधाची बारकी दुधाची तवली ठेऊन शेतात जायची…
कॉलेज वरून घरी आल्यावर पोटात प्रचंड भूक असताना ते मंद आचेवर तापलेले ते थोडेफार दूध आणि ती भाकर खाताना जो स्वर्गीय आनंद मिळायचा तो मी शब्दात वर्णनच करू शकत नाही…
माझ्या समवस्कत असणाऱ्या अनेकांना तो नक्कीच असेल… होय!माझ्या मते तो जगातील सर्वात सुंदर आणि पोषक आहार होता…
हा पोषक आहार आम्ही भावी पिढी साठी नक्कीच ठेवला नाही… जर्शीच्या गाईने दुधाची वाट लागली आणि गॅस ने भाकरीची वाट लागली.. जग पिझ्झा बर्गरचा विचार सोडून ज्वारी बाजरीचा किमान विचार तरी करू लागले आहे.एवढीच काय ती समाधानाची बाब आहे… आम्हाला आमची बलस्थानेच कळेनाशी झाली आहेत…
आम्ही ऊस,मका,सोयाबीनच्या मृगळामागे धावत आहोत… साखरे ने डायबिटीस आणि तेलाने हृदयविकार याची सुंदर भेट आपणास दिली आहे.. त्यात जर्शी गायी आणि पांढऱ्या कोंबड्या ही काही कमी नाहीत… स्वदेशी वाणांच्या ज्वारी बाजरी चे क्षेत्र नक्की वाढले पाहिजे त्याच बरोबर देशी दूध,आणि गावरान कोंबड्या यांचा ही विचार आपण केला पाहिजे… सकस पिकवा आणि सकस खा या विचाराने मूळ धरले पाहिजे…
यातून पैसा ही नक्कीच उभा राहील.जगाची शेवटची आशा आणि आधार ही शेवटी हा शेतकरी आणि ग्रामीण विभाग आहे…
केवळ पैसा पैसा करणारी माणसं फाईव स्टार हॉटेल मध्ये ही दुःखीच आहेत… आपल्या चुलीवरच्या दूध भाकरीचे महत्व आपल्या अमेरिका सारख्या देशाने सांगावे… हा आपला स्वाभिमान आहे की वैचारिक दारिद्य्र आहे हेच मला कळेनासे झाले आहे…
माझे देशी गाईचे दूध आणि ज्वारीची भाकरी कुठे हरवली… या पापात माझा ही एक शेतकरी म्हणून तेवढाच सहभाग असावा…
-कवी,राजेंद्र सोनवणे.
९८८१६११३७८
Leave a Reply