दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना
जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना ।।१
जळत असते तेल, देऊनी प्रकाश सारा
आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा ।।२
बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते
आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते ।।३
कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी
गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ? ।।४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply