नवीन लेखन...

सुरक्षित गुंतवणूक

कोविड- १ ९ महामारीचा परिणाम व्यक्तिगत , सामाजिक स्तरावर आणि पर्यायाने विविध संस्थांवर झपाट्याने होत आहे वा झाला आहे . जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा अतिशय विपरीत परिणामही झालेला दिसून येत आहे . सर्वच विस्कळित झाले आहे . एकंदरीत सगळीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .

कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आपली अत्यावश्यक अथवा अनिवार्य असलेली आर्थिक देणी जसे की , भाडे , कर्जाचा मासिक हप्ता , जीवनावश्यक सोयी सुविधा , विमा हप्ते वगैरे यावर याचा परिणाम होणार नाही याची काटेकोर दक्षता घेणे आवश्यक ठरेल . त्याचप्रमाणे गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढून गुंतवणूक करू नये . जेणेकरून भविष्यात कर्जाच्या दुष्ट विळख्यात अडकून मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागेल . जरा जरी शंका वा संशय आला तरी अधिकृत गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य तो सल्ला घेणे हितावह ठरेल .

सोन्यातील गुंतवणूक ही व्यापक ओळख असणारी आणि वाढत्या महागाईवर रामबाण औषध असणारी अशी गुंतवणूक आहे . तथापि वैयक्तिक सोने खरेदी करण्यापेक्षा रिझर्व्ह बँकेने विक्रीस काढलेले सॉवरीन गोल्ड बॉण्ड हे तुलनेने अधिकतम फायदा देणारी गुंतवणूक ठरेल . पर्यायाने Gold ETF पेक्षाही हितावह ठरेल.

एवढे असले तरी सुरक्षित गुंतवणूक म्हणून आताच्या क्षणाला महत्त्वाची आहे ती मुदत ठेवीतील गुंतवणूक , जी किफायतशीर आहे . अधिकतम व्याजदर देणाऱ्या काही बँका आपण निवडू शकतो . तथापि , एखादी बँक निवडली की तिच्या एकूणच आर्थिक परिस्थितीचा सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे . जेव्हा एखादी बँक सर्वात जास्त व्याज दर देण्याचे जाहीर करते तेव्हा अतिशय विचारपूर्वक पाऊल उचलून गुंतवणूक करणे आवश्यक आहे . कारण अधिकतम व्याज दर देऊन ठेवी गोळा करणाऱ्या बँकेला कदाचित तरलतेचा प्रश्न भेडसावत असू शकतो . किमान पाच लाख मर्यादेपर्यंत ( व्याजासह ) गुंतवणूक करावी . म्हणजे भविष्यात संबंधित बँक जरी अडचणीत आली , तरी ही ठेव रिझर्व्ह बँकेच्या ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून किमान रक्कम तरी मिळू शकेल . या मार्गाने अधिकतम व्याज देणाऱ्या योजनांचा आनंद आपण उपभोगू शकतो .

अलीकडे काही मोठ्या बँका सर्वसाधारणपणे १ ते ३ वर्षे कालावधीकरिता ५ ते ५.५० टक्के व्याजदर देत आहेत . यामध्ये सुद्धा गत काही काळात रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे रेपो दर कमी होत आहे . परंतु जशी जशी महागाई वाढेल तसतसा रेपो दरही वाढेल अशी अपेक्षा आहे साहजिकच आपल्या गुंतवणुकीवर कोणतीही अधिक जोखीम नसणारी आणि अधिकतम परतावा देणारी गुंतवणूक म्हणून बँकेतील मुदत ठेवीतील गुंतवणूक पहावयास हरकत नाही . यासाठी आपण अजून एक करू शकतो . विविध मुदतीसाठी निधी गुंतविणे हा पर्याय आहे किंवा पुनर्गुंतवणूक पद्धतीचाही विचार हितावह ठरावा . जर निधींची नजीकच्या काळात आवश्यकता नसेल तर . यामुळे नजीकच्या काळात जर व्याजदर वाढले तर त्याचा फायदा आपण मिळवू शकतो .

बहुतांश गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे अशी गुंतवणूक करतात की , जणू आकाशाला गवसणी घालत आहेत आणि तीही कोणत्याही विनाजोखमीची आणि त्वरित लाभ देणारी आणि किमान आपली मुद्दल तरी सुरक्षित राहणारी अशी करतात . परंतु उच्चतम परतावा देणारी अथवा कमीत कमी जोखीम असणारी असा कोणताही गुंतवणुकीचा प्रकार सध्या तरी अस्तित्वात नाही.

गुंतवणूक ही दोन प्रकारची आहे . आर्थिक आणि आर्थिक नसलेली . ( Financial & Non – Financial ) पैकी आर्थिक गुंतवणूक ही दोन प्रकारची आहे . एक म्हणजे बाजाराशी निगडित . जशी स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड आणि दुसरी ठोक उत्पन्न देणारी . जशी सार्वजनिक भविष्य निधी आणि बँकांतील मुदत ठेवी . आर्थिक नसलेली ( Non – Financial ) म्हणजे सोने आणि स्थावर मिळकत . बहुतांश लोक यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. गुंतवणुकीचे सर्वसामान्यपणे दहा प्रचलित प्रकार आहेत .
1. Direct Equity
2. Equity Mutual Fund
3. Debt Mutual Fund
4. National Pension System
5. Public Provident Fund
6. Bank’s FD
7. Senior Citizens Savings ( SCSS )
8. Pradhan Mantri Vaya Vandan Yojana
( PMVVY )
9. Real Estate
10. Gold
पूर्वी रिझर्व्ह बँकेने गुंतवणूक पर्याय म्हणून ७.७५ टक्के बचत रोखे ( करपात्र ) जाहीर केले होते . परंतु २ ९ मे २०२० पासून हे रोखे देण्याचे बंद केले . वास्तविक हे रोखे ६ टक्के बचत ( करपात्र ) रोखे २००३ , याबरोबरच ७.७५ टक्के बचत ( करपात्र ) रोखे हे १० जानेवारी २०१८ पासून विक्रीस काढलेले होते आणि यांचा कालावधी ७ वर्षे होता . यानंतर १ जुलै २०२० पासून बदलत्या दराचे ( Floating Rate ) बचत ( करपात्र ) रोखे प्रक्षेपित केले . हा दर , दर सहा महिन्यांनी बदलणारा ( पुनर्रचित ) असणार आहे . सध्या याचा दर ७.१५ आहे . यात प्रथम बदल १ जानेवारी २०२१ ला होणार आहे . हे रोखे व्यक्तिगत स्वरूपात , अविभक्त हिंदू कुटुंब घेऊ शकतात . NRI यामध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत . किमान रुपये १००० वा त्या पटीत कमाल कितीही गुंतवणूक करू शकतो . कालावधी ७ वर्षे आहे . असो …

कोणताही आर्थिक म्हणजेच गुंतवणुकीबाबतचा निर्णय हा चांगला अथवा वाईट हे लगेच कळू शकत नाही . तो परिस्थिती सापेक्ष असतो . कोणतीही गुंतवणूक करताना मुद्दलाची सुरक्षितता आणि गुंतविलेल्या रकमेवर निश्चित असणारा परतावा मिळावा हाच प्रामुख्याने गुंतवणूकदारांचा प्राथमिक हेतू असतो . ठेवी गोळा करण्याची परवानगी सर्वच आस्थापनांना मिळत नाही . सबब ती फारच थोड्या आस्थापनांना मिळालेली आहे . यामध्ये प्रामुख्याने सहकारी पतसंस्था , बँका तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्था ( यांना रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र धारण करावे लागते ) यांचा समावेश आहे . याशिवाय काही गृहवित्त संस्थाही ठेवी गोळा करतात , तथापि त्यांचे नियमन नॅशनल हाऊसिंग बँकेकडून केले जाते. त्याप्रमाणे कंपनी कायदा १ ९ ५६ नुसार नोंदणी झालेल्या काही संस्था जशा की , निर्मिती , बांधकाम , पायाभूत विकास यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा काही संस्था ठेवी गोळा करीत असतात . परंतु यांचे नियमन केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडून केले जाते.परंतु काहीही झाले तरी आपली गुंतवणूक ही स्मार्ट गुंतवणूक ठरावी असे वाटत असेल , तर शक्यतो सर्टिफाईड फिनान्शियल प्लॅनर्सच्या सल्ल्यानेच ती करावी हे कधीही उत्तम . कारण आपला पैसा हा कष्टाचा , घामाचा आहे आणि तो योग्य ठिकाणीच गुंतविला जावा हीच प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असते . भविष्यात मानसिक ताण वाढण्यापेक्षा आणि बहुमोल जीवन उद्ध्वस्त होण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगलेच नाही का ?

–प्रकाश वीरकर
(विशेष कार्यपालन अधिकारी , सर्वोदय सहकारी बँक , भांडुप)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..