सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. त्यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला. जगदीप अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणुन त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानतंर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची मजबूत छाप सोडली. ‘शोले’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले. आपल्या हाव भावाने दर्शकांना हसविणा-या जगदीश यांच्या भूमिकेचा अंदाज खूप वेगळाच होता. जगदीप यांनी मच्छर इन पुराना मंदीर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे. नावेद व जावेद जाफरी यांनी टी.वी. वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply