नवीन लेखन...

सुसंगती..

आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की, 
अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात…

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, काही जपावी लागतात, तर काही आपोआप जपली जातात. असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती, जुळून आलेली नाती जास्त जवळची वाटतात. जी बंधनं मनाने जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. मैत्री म्हणजे सुंदर पहाट, कधीही न हरवणारी दोस्तीची वाट, मैत्री म्हणजे आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं, आणि सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न ! फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी मनासारखं जगायला, हसायला मिळतं, ते म्हणजे आपले मित्र !!

सर्वांनाच कधी न कधी एकटेपणा जाणवतो. एकटेपणाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे कुणीच नसताना जो वाटतो तो आणि दुसरा म्हणजे सगळे असूनही जाणवतो तो. हा दुसरा प्रकार जरा जास्त…हृदय विदारक असतो. आपण निराश होतो तेव्हा कोणाकडे तरी मन मोकळं करावंस आपल्या प्रत्येकालाच वाटतं. अशा वेळी आपले मित्र-मैत्रिणीच आपल्या भावना समजू शकतात आणि आपल्याला धीर देऊ शकतात. मैत्री करणे म्हणजे एकाकीपणा, एकटेपणा, असहायता, निराशा या सर्व दुःखांवर चांगलाच उतारा आहे. व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये पालक, पूर्वजांकडून मिळालेली गुणसूत्रे जितकी महत्त्वाची असतात, तितकीच सभोवतालची परिस्थिती, आजूबाजूची माणसं, त्यांचे स्वभाव, वर्तन या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. वैयक्तिक व्यक्तिमत्त्व विकासासाठी, लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं भेटणं.. हे ही खुप महत्त्वाचे असतं…!

Emotions & Attitudes are contagious. Surround yourself with Positive People who believe in you & your dreams.. We all need people in our lives that raise our standards, remind us of our essential purpose, and challenge us to become the-best-version-of-ourselves.

सहनशीलता असल्याशीवाय मैत्री जुळत नाही आणि क्वचित प्रसंगी जुळली तर ती काही कार्य साधण्यापुरतीच असते. मैत्री करायला शिकणं हा सामाजिकतेचा पाया आहे. मैत्री ही हिऱ्याप्रमाणे चकाकणारी नसली तरी चालेल पण आरशाप्रमाणे स्वच्छ असावी. ज्यांना आपल्या गुणांची ओळख आहे अशांचाच सहवास आपण नेहमी करावा. आपल्या गुणांची परीक्षा गुणज्ञांकडून झाली पाहीजे. ‘जगात काहीतरी श्रेष्ठ कार्य करणे’ ही ज्यांची धडाडी आहे अशांच्या सावलीला उभे राहिले म्हणजे आपल्यालाही दहा हत्तीचे बळ येते.

‘ढवळ्याशेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण लागला’ हे जरी खरं असलं, तरी हेच संपूर्ण सत्य नाहीये. आपण जे मित्र-मैत्रिणी निवडतो त्यांना समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मैत्रीमध्ये कधी कधी दुर्दैवाने चुकीच्या गोष्टी आजूबाजूला घडत असतील तर, त्यांना बळी न ठरता त्यातून आपला मार्ग मोकळा, योग्य वेळेवर करून घेणं जमायला हवं. त्याने पुढे जाऊन होणारे बरेच धोके टळू शकतात. ‘सवंग’ गोष्टींच्या आहारी जाणं फारसं कठीण नाही, पण जगात प्रेरणा देणारी, चांगलं काम करू पाहणारी अजून अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आहेत; त्यांचा आदर्श ठेवून स्वत:ला चांगला, सुजाण नागरिक, विद्यार्थी बनवणं हे आपल्या हातात नक्कीच असतं..! आयुष्यात खूप काही चांगलं करून दाखवण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची आणि एक समृद्ध जीवन जगण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला चांगल्या मित्र-मैत्रिणींची साथ असणं फार मोलाचं ठरतं. त्यामुळे आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना आधी चांगले मित्र निवडणं, त्यांची चांगली पारख असणं ही पहिली महत्त्वाची पायरी ठरते. खरे सौख्य मित्रांच्या संख्येत नसून त्यांच्या योग्य निवडीत आहे.

Company of Good People is like walking in a ‘Shop of Perfume’. Whether you buy the perfume or not, you are bound to receive the ‘Fragrance’..!

मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. मैत्री सुखदुःखाच्या ऊनपावसाने टिकते आणि सहानुभूतीने वाढते. खरी मैत्री मोकळ्या हृदयाने बोलते, न्यायाने सल्ला देते, शांतपणे सहन करते, धैर्याने मार्ग काढत जाते आणि केव्हाही मदत करण्यास तयार असते. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे ‘खरे मित्र’ म्हणजे हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. ‘तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे’ असं मैत्रीचं स्वरूप असायला हवं. साखर गोड आहे, हे कागदावर लिहून चालत नाही. ती खाल्ल्यावर तिची चव कळते अगदी तसेच नाते, मैत्री व प्रेम फक्त सांगून भागत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात.

“परमेश्वर ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच ‘मित्र’ म्हणून पाठवतो.” पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो…….

#श्याम..

सुसंगती..

Shyam’s Blog


 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..