नवीन लेखन...

अभिनेता सुशांत शेलार

अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून ते थिएटर, टीव्ही पण जोडलेले आहेत. मुंबईतून त्यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालय केले. त्यांनी बालपणी अनेक नाटके व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता १९९१ साली बाल कलाकार म्हणून काम करणारी त्यांची कारकीर्द सुरू झाली.

मयूरपंख मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. महाविद्यालयीन दिवसांपासून ते आपल्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय होते आणि आपल्या कारकीर्दीसाठी अनेक गोष्टी करीत आहेत. त्यांच्या काही नाटकांमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय, अयत्यावर कोयता, बहुरुपी पु. ल आणि आधी बसू मग बोलू यांचा समावेश आहे. सुशांत शेलार यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा दुनियादारी हा चित्रपट प्रचंड हीट झाला होता. या चित्रपटातील त्याची प्रीतमची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्याचबरोबर त्यांनी क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

सुशांत शेलार यांनी रूपेरी पडदयाबरोबरच आपल्या अभिनयाची चुणूक छोटया पडदयावरदेखील दाखविली आहे. त्यांनी या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत. सुशांत शेलार हे एक चांगला कवी आहेत आणि त्यांनी कविता व इतर लेखन केले आहे. ते आपल्या वैयक्तिक जीवनात श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांची समर्थ व्हिजन नावाची संस्था आहे.

सुशांत शेलार यांची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून एक नाळ जोडली गेली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांने या ‘कबड्डी’ सामन्यांचे आयोजन केले आहे. सुशांत शेलार यांचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने दर वर्षी सुशांत शेलार हे सामने भरवित असतात. सुशांत शेलार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुशांतच्या चाहत्यांना तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. सुशांत शेलार हे शिवसेनेच्या चित्रपट सेना कार्याध्यक्ष आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..