नवीन लेखन...

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची ओळख १९७७ पासुनच निर्माण झाली. आपल्या वक्तृवानं सुषमा भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचला. भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी सियालकोट पंजाब येथे झाला.

सुषमा स्वराज यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. सुषमा स्वराज यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली.

पुढे चंदीगडमधून लॉची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. सुषमा स्वराज यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल व वकिल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला होता. लग्न झाल्यावर सुषमा स्वराज यांनी अडनाव म्हणून पतीचे नाव ‘स्वराज’ लावण्यास सुरुवात केली.

त्यांचे पती स्वराज कौशलही याच काळात सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते.

१९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या. सुषमा स्वराज यांनी १९७७ ते ८२ आणि १९८७ ते ९० सालापर्यंत हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून काम केलं. १९७७-७९ दरम्यान सुषमा स्वराज यांनी हरियाणा सरकारमध्ये विविध मंत्रीपदं सांभाळली. १९९० मध्ये सुषमा स्वराज यांची पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली.

१९९६ मध्ये सुषमा स्वराज पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. ११ व्या लोकसभा निवडणुकीत १६ मे-१ जुन १९९६ दरम्यान त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं.

१३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला. सुषमा स्वराज या प्रामुख्यानं समोर आल्या, जेव्हा त्या १९९९ मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. ही निवडणूक त्या हरल्या. त्यानंतर २००४ मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं पुढं आणलं तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला. देशातील सर्वोच्च स्थानी जर परदेशी महिलेला बसवलं तर स्वत:ला बोडकं करणार… सुषमा स्वराज यांच्या या धमकीनंतर देशात एक मोठं नाट्य घडलं होतं.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये २०००-२००३ दरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले. २००३-२००४ दरम्यान त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले, तसेच त्यांनी दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.

२०१४ ते २०१९ या काळात सुषमा स्वराज यांनी मोदी सरकार मध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. सुषमा आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी आहे. तिचे नाव बांसुरी आहे. श्रीकृष्ण हे आवडते दैवत असल्यामुळे सुषमा यांनी मुलीचे नाव बांसुरी ठेवले. ती देखील वकील आहे. सुषमा स्वराज यांचे निधन ६ ऑगस्ट २०१९ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..