41. घरात (व शेजाऱ्यांकडे) येणाऱ्या वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका त्यांचे काम झाल्यावर फेकून न देता साठवून ठेवाव्यात. सुटीत त्यापासून विविध आकारांचे बुकमार्कस् करता येतील.
42. काही निमंत्रण पत्रिकांचा कल्पकपणे वापर करुन सुंदर शुभेच्छा पत्रे तयार करता येतील.
43. एका पोस्टकार्डच किंमत पन्नास पैसे आहे. चाळीस दिवस सुटी आहे असे जर गृहित धरले तर आपणास चाळीस पोस्टकार्ड लागतील. म्हणजे खर्च फक्त वीस रुपये. मुलांनी रोज एक पोस्टकार्ड लिहायचे आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना. एखादी बातमी किंवा लेख वाचून वर्तमानपत्राला, साप्ताहिकाला, मासिकाला. पुस्तके वाचून आपल्या आवडत्या लेखक/लेखिकेला. मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षकांना.
44. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मस् मुलांकडून भरून घेतले पाहिजेत.मनीऑर्डरचा फॉर्म. रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्याचा फॉर्म. बँकेत पैसे कसे भरावे, चेक कसा भरावा, पैसे कसे काढावेत यासाठी भराव्या लागणाऱ्या स्लीपस् .
45. घराजवळच्या बँकेत मुलाच्या नावाने खाते सुरू करता येते. त्यासाठी मोठ्या माणसांनी त्याच्या सोबत बँकेत जावे. खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी प्रा*या मुलानेच पार पाडावी. अगदी आवश्यकच असेल अशा ठिकाणी पालकांनी मुलांना मदत करावी. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून प्रत्येक महिन्याला थोडीफार बचत करावी.
46. घरातील टेलीफोनच्या जवळ एका रफ वहीची गरज असते.पटकन पत्ता लिहून घ्यायला किंवा एखादा नंबर टिपून ठेवायला त्याचा उपयोग होतो. शाळेतल्या वापरलेल्या वह्यांमधील कोरे कागद काढून, ते एकत्रितपणे शिवून रफ वही तयार करता येईल. थोड्याशा सरावाने चांगली वही पण तयार करता येईल.
47. घराजवळ जर एखादा ओळखीचा व्यावसायिक असेल तर त्याच्या दुकानात जाऊन काही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि काही गोष्टी स्वत:हून शिकणे. यासाठि त्या व्यावसायिकाची परवानगी घेणे, त्याच्या सोयीनुसार आपली वेळ जुळवून घेणे गरजेचे आहे. उदा. शिंपी कपड्यांची मापे कशाप्रकारे घेतो. कापड कसे बेततो. शिलाई मशीन, काजे मशीन व ओव्हरलॉक मशीन यातील नेमका फरक काय. एखादे जुने कापड घेऊन कुठल्याही मापाचा एखादा शर्ट शिवण्याचा घरी प्रयत्न करणे. (हा प्रयत्न म्हणजेच भूमिती व अंकगणिताचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.)
48. त्याचप्रमाणे घराजवळील किराणामालाचे दुकान, लॉन्ड्री, बेकरी, डेअरी, औषधाचे दुकान, दवाखाना अशा ठिकाणी रोज दिवसांतून एक तास मुलांनी मदत करण्यासाठी जावे. अशावेळी परवानगी मिळविण्यासाठी,कामाचे स्वरुप ठरविण्यासाठी, वेळ निश्चित करण्यासाठी घरातील मोठ्या माणसांनी मुलांना मदत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी घरी आल्यावर ‘आज काय नवीन शिकलास?’ असे त्यांनी मुलांना विचारणे ही अपेक्षित आहे. (कृपया एक गोष्ट लक्षात घ्या. ‘दुकानात एक तास जाणे म्हणजे पुड्या बांधायला जाणे’ असा गैरसमज करुन घेऊ नका. काहीही काम न करता सुध्दा मुलाने एक तास दुकानात बसणे हे ही शिकणे आहे.)
49. गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, आकार, त्यावरील चित्रे इ. याचे मुलांनी कालजीपूर्वक निरीक्षण करावे. त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शीर्षके पण काळजीपूर्वक पाहावित. विशिष्ट वस्तूचा किंवा गोष्टिंचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सुलेखन. मुलांनी एक सुलेखन वही तयार करावी. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले, निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पध्दतीने लिहावित. म्हणजेच ‘जीराफ’ ज्या प्रकारे लिहिले असेल त्यापेक्षा ‘ससा’ वेगळ्याप्रकारे लिहिलेले असेल.
50. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी शक्यतो टाकाऊ वस्तूंचाच वापर करायचा आहे. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही चित्र काढावे / आकृती काढावी / ठिपक्यांची रांगोळी काढावी व त्यात रंग न भरता त्याऐवजी रंगीत टाकाऊ वस्तूंचा उपयोग करावा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, गवत, सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, प्लास्टीकचे तुकडे, लाकडाचा रंगीत भुसा, शेंगांची टरफले, पालेभाज्या निवडून झाल्यावर उरणारी मुळे बारीक चिरुन, चहाचा चोथा इत्यादी.
51. तुमच्या परिसरातील काही दुकानदारांकडे तुमच्या ओळखी असतील. दुकानदाराच्या आणि तुमच्या मुलाच्या सोयीने, दिवसातील दोन तास मुलाने दुकानात काम करायला हरकत नाही. मुलाने त्याला आवडेल ते काम करावे व नवीन काम ही शिकावे.
52. आपल्या घरात पंखा, इस्त्री, मिक्सर, टेपरेकॉर्डर अशा वस्तू असतात. या वस्तूंच्या आत काय असतं? त्या कशा काम करतात? याबाबत मुलांना प्रचंड कुतुहल असतं. ज्या दुकानात अशा वस्तू रिपेअर केल्या जातात अशा दुकानात मुलांना घेउन जावं. दुकानदाराच्या परवानगीने मुलांना निरीक्षण करण्याची व प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.
53. याचप्रकारे मुलांना जवळच्याच गॅरेज मधे घेऊन जाता येईल.
54. आंबा, फणस, अननस, पपई, कलिंगड, सिताफळ, रामफळ ही फळं कापण्याची पध्दत वेगवेगळी आहे. मुलांना त्याचा अनुभव मिळणे जरुरीचे आहे. मुलांसोबत फळं कापण्याचा अनुभव घ्या.
55. गाजर, मुळा, काकडी, टॉमेटो किंवा बीट यांची कोशिंबीर करणे मुलांना जमू शकते. आठवड्यातून दोन दिवस मुलांनी कोशिंबीर करावी यासाठी पालक मुलांना मदत करतील. (मुलांनी केलेली कोशिंबीर,पालक आनंदाने खातील)
छान मला खुप आवडले आपले विचार