स्वाभिमान हा माणसाचा एक जन्मजात गुण आहे. प्रत्येकात असतोच. आणि असावाही. पण अतिरेक झाला की ते फारच असह्य होते. आणि जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा खूप खूप वाईट वाटते अशावेळी सयंम ठेवावा लागतो नाही तर भयंकर वाईट प्रसंग येतात. तर कधी कधी आपल्यालाच मनाला मुरड घालून गप्प बसावे लागते. अशी ठिकाणी आहेत तिथे संयम ठेवावा लागतो.
कार्यालयात बॉस आपल्या हाताखाली काम करणारे लोक म्हणजे सहकारी आहेत यांच्या मुळे आपण आहोत हे सोयिस्कर विसरतात आणि पाण उतारा करतात अपमान करतात तेही चारचौघात स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा.
दवाखान्यात तुम्ही कितीही मोठे असाल सर्व बाजूंनी तरीही रांगेत उभे राहून वाट पहावी लागते. त्यातून तिथे दाखल करण्यात आले की अगदी पावलोपावली जे ऐकून घ्यावे लागते आणि वागणूक दिली जाते किंवा घरात जरी एखादी व्यक्ती पैसे देऊन ठेवली असेल अगदी हाच अनुभव येतो तेव्हा.
आपल्या कडे गाडी आहे किंवा नाही पण रिक्षा. टॅक्सी. इतर वाहन. बस वगैरे याचा उपयोग करून घ्यायचा आहे. रिक्षा वाला नकार देतो. वाजवी पेक्षा जास्त पैसा घेतो. फसवणूक केली जाते. बस रेल्वे मध्ये तर बरेच काही घडून जाते. नको असलेले ऐकून घ्यावे लागते. वागवले जाते तेव्हा.
लग्नाच्या नतंर हेच शिकवले होते का? ऐपत नव्हती तर कशाला अशी स्थळे पहायची. शिक्षण म्हणजेच सार काही नाही. अमूक एका घरात कशी आहे सून नशीब लागते. तुला काही करता येत नाही. आमच्या ऑफिसात मोठ्या पदावर असलेली अमूक एक किती गोष्टी येतात तिला गाणे. नाच. पेंटिंग आणि पदार्थ तर लाजवाब असतात रोज डब्यात इति नवरोबा तेव्हा.
आता हे सगळे कालबाह्य झाले आहे असे म्हणत चांगले जाते न पटणारे न आवडणारे सुरू होते. आणि उलट सूचना देण्यात येणार. टिव्ही आवाज कमी करा. जोरात खोकलू नये. अस करु नये तस करु नये लहान मुलांना सांगितले जाते तसेच एवढेच नव्हे तर बैठकीत कुणी आले की खुणावले जाते खोलीत जा. बाहेर जाताना कुठे कधी कशाला हे सांगितले जात नाही आणि चौकशी केली तर सुनावले जाते. नातवंडांना काही शिकवलेले आवडत नाही. उपदेश तर मुळीच नाही. आता मला भरपूर पगार मिळतो माझ्या मुलांनी मन मारलेले मला नको आहे तुम्हाला काही प्राॅबलेम आहे का अशा भाषेत सुनावले जाते आणि खूप गोष्टी आहेत दरवेळी स्वाभिमान दुखावला नव्हे डिवचला जातो तेव्हा.
ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या मराठीचे केलेले नुसतेच कौतुक नाही तर पसायदानाने जगाला शिकवण दिली तीच आमची मायबोली आज आपल्याच माहेरी परकी झाली आहे. तिचे आजचे इंग्रजाळलेले रुप आणि इतर भाषेचे झालेले परिणाम हे सगळं पाहून नुसताच त्रास होत नाही तर स्वाभिमानाला खूप मोठी जखम होते. दुसऱ्यांचे माहित नाही पण आपल्या महाराष्ट्रात भाषा शिकायला जाण्यापूर्वी सरस्वती जी विद्येची देवता तिची पुजा करुन घरातील मोठय़ा माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन शाळेत जातात. गुरुजींना नमस्कार करतात. तेव्हा मायबोलीचे किती कौतुक होते हे आपल्याला माहित आहे. आणि आता हे सगळे पार बदलून गेले आहे ते पाहून स्वाभिमान.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply