चिमण्या आल्या दोन कोठूनी,
बांधून गेल्या घरटे ।
खेळूनी नाचूनी,
चिव चिव गाणे गात वाटे ।।१।।
झाडावरती उंच बसूनी,
रात्र घालवी हलके हलके ।
दाणा टिपणे पाणी पिणे,
स्वछंदाचे घेवूनी झोके ।।२।।
संसार चक्र भोवती पडता,
गेल्या दोघी त्यातच गुंतूनी ।
नव पिल्लाच्या सेवेसाठी,
घरटे केले काड्या आणूनी ।।३।।
पिल्लांना त्या पंख फुटता,
उडूनी गेल्या घरटे सोडूनी ।
अल्प काळाचे बंधन तोडीत,
जगण्या पुनरपी स्वच्छंदानी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply