मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किंवा अगदी पनवेल, खोपोली, एवढंच कश्याला पार कोकण किंवा एखादे देशावरी गाव घ्या, अश्या कुठल्याही ठिकाणी घरात काही शुभाकार्यानिमित्त खरेदी करायची असेल तर ती दादरला हमखास केली जाते हा माझा अनुभव आहे. मग भले त्या त्या गावी किंवा शहरी एखादे चांगले मॉल किंवा काही दुकाने असतील तरी त्या दुकानांतून खरेदी केली जात नाही याचे काय इंगित किंवा गणित आहे ते अजून कळले नाही. आता याला श्रद्धा, विश्वास, नाविन्य का काय म्हणायचं !
साधारण ३०-४० वर्षांपूर्वी मी दादरला काहीना काही निमित्ताने येत असे पण त्या काळी एवढी गर्दी आणि अस्वच्छता नव्हती. परंतू काही महिन्यांपूर्वीच दादरमध्ये कामानिमित्त भटकत असता प्रथम मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे दादर मधील पुथपाथ, पूर्व आणि पच्छिम उपनगरांपेक्षा खूपच रुंद आणि स्वच्छ सुद्धा आहेत. परंतु दादर स्थानक पच्छिम ते कबुतरखाना या वाटेवर सणासुदीला इतकी अस्वच्छता असते की काही विचारू नका. अधिकृत का अनधिकृत फेरीवाले इतकी अस्वच्छता करतात की बिचाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता पथकाला दिवसाचे २४ तास हातात झाडू घेऊनच उभे राहावे लागेल. पावसाळ्यात अस्वच्छतेची परिसीमाच असते. रत्यावर एक ते दीड इंचाचा घाणीचा थर असतो आणि त्यातून वाट काढत स्टेशन पर्यंत पोहोचणे म्हणजे एक दिव्यच असते.
स्वच्छता राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि स्वच्छ व सुंदर भारत म्हणजे राष्ट्रभक्तीचा जागर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून, गांधी जयंतीपासून सुरू झालेले देशातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान कोणतेही राजकारण न करता यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई आणि परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्याची नितांत गरज आहे. घाणीचे साम्राज्य पूर्व आणि पच्छिम उपनगरातील बऱ्याच स्टेशन्स समोरील रात्यांवर बघण्यास मिळते. यावर महानगरपालिका काही ठोस पाऊल उचलणार आहे का असेच वर्षानुवर्षे चालू राहणार?
नुकत्याच येऊन गेलेल्या गणपती उत्सवाच्या आधी एक आठवडा दादरस्थित कबुतरखानाच्या आसपास, भवानीशंकर रोड ते शारदाश्रम रोडवरील सर्व पुथपाथ अक्षरश: गणपतीच्या मूर्ती विक्रेत्यांनीच भरून गेलेले होते. कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण यामुळे लहान मुलं, वरिष्ठ नागरिक, महिला यांना पुथपाथवरून चालणे अशक्य होते. फेरीवाल्यांना एखादी तातपुर्ती जागा सणासुदीच्या दिवसात अल्प भाडे तत्वावर द्यावी याने हा प्रश्न कदाचित सुटू शकेल. नवरात्रात ह्याच रोडवर वेण्या आणि फुलावाल्यांचे साम्राज्य असते. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंब, लहान मुलं आणि इतर मदतनीस रत्यावरच जेवण करतात, तेथेच जेवल्यावर भांडी घासतात, लहानमुलं रत्यावारच प्रातर्विधी करतांना दिसतात. फुलवाले एवढा कचरा करतात आणि तसाच बाजूला ठेऊन देतात. परंतु याहीपेक्षा ग्राहकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. त्यांनीही रत्यावरील वस्तू विकत न घेण्याची सवय लाऊन घेणे आवश्यक आहे. तरच रत्यावर विक्रेते कमी बसतील. मान्य आहे की भारतात गरिबी खूप आहे आणि मुंबईत आणि परिसरात इतर राज्यांतून बरेच नागरिक आपले भविष्य अजमावण्यास येतात. दोन धंदे करतात पण त्यांना शिस्त नसते. आपण बघतो एखादी व्यक्ती विदेशात गेली तर ती तेथे रत्यावर थुंकत नाही, कचरा टाकत अथवा करत नाही. कारण त्या व्यक्तीला भीती असते कायद्याची आणि पोलिसांची. त्याचा किंवा तिचा पासपोर्ट जप्त होण्याची आणि स्वत:च्या इज्जतीलाही ती जपत असते. पण मग ती व्यक्ती आपल्या स्वत:च्या घरात अशी घाण करते का? कचरा करते का? मग परदेशातून आपल्या देशात आली की ती व्यक्ती अशी का वागते? हे एक गूढच आहे.
सध्या देशातील बऱ्याच राज्यांत डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या रोगांचा फैलाव होताना दिसत आहे आणि यात बरेच रोगी दगवातांना दिसतात. एवढेच नाही तर मुंबईतील महानगर पालिकेच्या हॉस्पिटल मधील दोन-चार डॉक्टरांना याची लागण झाल्याचे ऐकिवात आहे. अश्या रुग्णांवर इलाज करण्यासाठी गरीब/पिडीत रुग्ण जर अस्वच्छता असलेल्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊन इलाजाची अपेक्षा करीत असतील तर त्यांच्या पदरात काय पडणार आहे?
जगदीश पटवर्धन
Good article. But the same story repeats on 6th December also. Why didn’t you write about that? Why only Hindu Utsavs?
छान लेख आहे. मला आवडला….