चिमण्या आल्या दोन कोठूनी, घरटे बांधून गेल्या त्या
खेळूनी नाचूनी उड्या मारूनी, चिव चिव करित गात होत्या
झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवीती हलके हलके
दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके
संसार चक्र ते भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी
नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी
पिल्लांना त्या पंख फूटता, उडूनी गेल्या घरटे सोडूनी
अल्प काळाचे बंधन तोडीत, जगण्या पुनरपी स्वच्छंदानी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply