नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

अनेक महापुरुषांनी स्वामी विवेकानंदाच्या विचारदर्शनाने आपण प्रभावित झाल्याचे म्हटले आह. महात्मा गांधी म्हणतात, “विवेकानंद वाङमयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली आहे.” नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, “आज जर स्वामी विवेकानंद असते तर मी त्यांची माझ्या गुरुस्थानी स्थापना केली असती.” पंडित जवाहरलाल नेहरु म्हणतात की, “विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय कणारे महापुरूष होते.” “स्वातंत्रवीर सावकरांपासून ते जमशेटजी टाटा” यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदाचे जीवन आणि विचारदर्शनातून प्रेरणा घेतली आहे.

स्वामी विवेकानंदाचे भाषेवर विलक्षण प्रभूत्व होते. शिवाय भारतभर केलेल्या प्रवासात त्यांचे मन उत्कंट बनले होते. स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे मांडलेले विचार म्हणूनच प्रभावी ठरले ते म्हणाले, माझाच धर्म खरा ही संकुचितवृत्तीच आहे. आकाशातून पडणारे पाणी शेवटी समुद्राला मिळते, तसे तुम्ही कोणत्याही देवाची उपासना केली, तरी ती ईश्वराला पोहचते. ही हिंदू धर्माची उदात्त व व्यापक विचार धाराच जगात शांतता प्रस्थापित करु शकेल. त्यांच्या विचारांची कल्पकता, चतुरस्त्र व्यक्तिमत्व सर्वांगीण अभ्यास वाचनातील गती, साधना प्रचंड प्रवास, चिंतन सर्व समावेशक दृष्टीकोन स्वधर्माबद्दल स्वाभिमान बाळगून ही इतर धर्माबद्दल मनात जपलेली सद्भावना अध्यात्मावर श्रध्दा असूनही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब यामुळे स्वामी विवेकानंदचे वक्तृत्व आणि कर्तृत्व जगभर फुलले आहे. स्वामी विवेकानंदानी स्पष्टपणे सांगितले आहे की, माझे म्हणणे तुम्हांला ऐकायच असेल तर, तुम्हांला आपल्या खोलीची दार सताड उघडी ठेवावी लागतील. तुमच्या अवती भोवती दारिद्राद्याला गांजलेले कितीतरी लोक मोठ्या कष्टात जीवन जगत असतील त्या सार्‍यांची तुम्हांला यथासाध्य सेवा करावी लागेल. जे लोक रोग पिडीत असतील त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करुन द्यायला हवी आणि स्वत: खपून सेवा करायला हवी. जे भुकेलेले असतील त्यांच्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था करायला हवी. तुम्ही इतके शिकला आहात. भोवताली अडाणी, अशिक्षित लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करा.

या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. औदार्य, शुचिता, शांती यांचे उत्तुंग आदर्श येथे निर्माण झाले आहेत. आंतरदेशीवृत्ती आणि अध्यात्म यांची भारत जन्मभूमी आहे. हा स्वामी विवेकानंदाचा विचार युवकांना प्रेरणा देणारा आहे. त्याच्या भवितव्याची ग्वाही देणारा आहे. समाजाचा शिक्षण या विषयावरील स्वामी विवेकानंदाचा विचार मौलिक, म्हणून माननीय आहेत. मनुष्यत्व निर्माण करणे हेच शिक्षणाचे प्रमुख कार्य आहे. असे स्वामी विवेकानंदाचे प्रतिपादन आहे. त्यांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगायचा तर ते म्हणतात, “शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे ते प्रगटीकरण असते. You Know very Little amons you. ज्ञानाचा साठा हा जन्मत:च मनुष्याजवळ असतो. शिक्षण म्हणजे आत्म्यावरील आवरण दूर करणे होय. म्हणजे मग माणसाला खरे ज्ञान होते. आज पर्यंत जगात कुणीही कुणाला शिकवले नाही. प्रत्येकजण स्वत:च गुरू

होऊन स्वत:च शिकत असतो. एखादे रोपटे जसे स्वत:च स्वाभाविकरित्या वाढते तसेच मूल सुध्दा स्वाभाविकरित्या शिकते. आपण पालक त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत फक्त मदत करू शकता. आत वसत असलेल्या ज्ञानाला जागे करण्याचे आणि शिकण्याच्या मार्गातील अडचणी दूर करण्याचे काम पालकांनी, शिक्षकांनी करावयाचे असते. हात, पाय, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या विविध इंद्रियाचे शिकवण्यासाठी योग्य रित्या उपयोग करण्याचे शिक्षण तेवढे आपण द्यायचे. आई वडिलांनी अवास्तव अधिकार गाजवल्यामुळे मुलांच्या स्वातंत्र वाढीला वाव मिळत नाही. शिक्षण हे शीलवान, चारित्र्यवान माणसे घडविण्याचे साधन आहे. माणूस आपल्या पायावर उभा राहू शकेल “अशाच शिक्षणाची आवश्यकता स्वामी विवेकानंदानी सांगितली आहे. एकाग्रता ज्ञान भंडार उघडू शकणारी एकमेव गुरुकिल्ली आहे. हे ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणार्‍यानी ध्यानात ठेवावे. असे हे विवेकानंदाचे शिक्षण, चिंतन मुलभूत सखोल आहे.

(त्यांचे तत्वज्ञान असे आहे की तेजोभंगाने कोणताही कार्यभाग सफल होत नसतो. तेवढ्यासाठी आपण स्वकीयांना सदैव उत्कर्षाची प्रेरणा घ्यावी. आत्मनिर्भरता कधीही करु नये. आपण जुन्या रुढीचे खोटे समर्थन करु नये. असल्या भोळसट पणापेक्षा मग तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल. आपण आत्मसात करित असलेल्या नवनव्या शास्त्राचा असा हा गैर उपयोग होऊ नये. अशी ही नव्या अर्थाने स्वामी विवेकानंदांना धर्मशांती अपेक्षित होती.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..