भंग पावले पाहीजे स्वप्न माझे रातचे
तोडणे स्वप्न श्रृंखला नसे मानवी हातचे ।।
शिथिल गात्र बनती जाता निद्रेच्या आधीन
उघडले जाते मग विचारांचे दालन ।।
किती काळ भरारी घेई निश्चीत नसे कांही
विचार चक्र थांबता स्वप्न दोष तो जाई ।।
रात किड्यानो जागवा स्वप्नावस्थे मधूनी
कुकुट कोकीळा येई मदतीसाठी धावूनी ।।
वाऱ्याची थंड झुळुक पुलकीत देहा करी
उषा राणीचे प्रयत्न यशस्वी सदैव ठरी ।।
प्रयत्न करितो निसर्ग निद्रावस्था मोडण्याचा
स्वप्नाचा दोष काढूनी निरोगी बनविण्याचा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply