हे चांदणे नभीचे अन्
पौर्णिमा शरदातली
वाहणारी ही हवा अन्
दिवाळी स्वप्नातली..
गुणगुणतो पहाटवारा
दवबिंदू शीतल शीतल
स्तब्ध धूसर डोंगरमाथे
ऐकती शांतता निश्चल..
फांदी फांदी वरून उडतो
क्षणा क्षणांचा स्वप्नपक्षी
अन् हृदय प्रदेशी रेखीत जातो
जाणिवांची अपूर्व नक्षी…
—आनंद
Leave a Reply