ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला भावते
कल्पनेचे राज्य जरी असे, आनंददायी वाटते….II धृ II
तव प्रतिमा ही मनी बसवली, आठवण सदैव येवू लागली
जागेपणी जे मिळे न मजला, स्वप्नी मी सारे तेच अनुभवते…….१
स्वप्न मजला भावते,
पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे
हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२
स्वप्न मजला भावते,
कल्पना भाव तरंगे उठूनी, रात्री गेल्या कित्येक रंगूनी
क्षणीक असूनी भ्रामक जरी, स्वप्न दिलासी देवून जाते….३
स्वप्न मजला भावते,
विश्वपसारा मायेचा हा, जीवन गुंता दिसतो पहा
किरण आशेचे त्यात चमकूनी, स्वप्न हे वरदान ठरते….४
स्वप्न मजला भावते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply