स्वप्नावरही माझ्या ठेवू नको पहारा…
नुकताचं चांदव्याने केला मला इशारा
नौका सोडली मी उधाणत्या सागरी अन्
बेभान वादळाने केला मला इशारा….
जखमेवरती फुंकर हळुवार घालता तू
अलवार वेदनेने केला मला इशारा…
डोळ्यात पाहिले तुझ्या रोखून काय जरासे
भयंकर संकटाने केला मला इशारा…
ओठांस तुझ्या ओठांचा टोचला जरासा काटा
घायाळ गुलाबाने केला मला इशारा….
तुज स्पर्शुन आल्या वार्याने मज हलकेच स्पर्श करता
बेधुंद अत्तराने केला मला इशारा…
विखुरशील तुकड्यात तू करता गुन्हा प्रितीचा
सांभाळ…! काळजाने केला मला इशारा….
उज्वला सुधीर
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
Leave a Reply