नवीन लेखन...

स्वप्ने पहा, जोखीम घ्या आणि यशस्वी व्हा !!!

स्वप्ने पाहिल्याशिवाय प्रगती होणार नाही, म्हणून स्वप्ने पाहणे हे अतिशय महत्वाचे आहे. स्वप्ने पाहणे सोडून देवू नका. त्यावरच तुमचे पुढील आराखडे ठरविता येतात. परंतु, त्याहूनही महत्वाचे म्हणजे जोखीम (रिस्क) घेणे होय. ती घेतल्यामुळेच आपण किंवा इतर कोणीही कल्पना न केलेली उंची गाठू शकतो. आपण आपली स्वप्ने सत्त्यात उतरविण्याचे आपणाकडे धैर्य असावे लागते. त्यासाठी पुढील उपाय योजना करावी– १) आपले इतरांशी असलेले सम्बन्ध सुधारा. २) आपले ग्राहक असल्यास त्यांच्या हिताचा जरूर विचार करा किंवा त्यांचे हित जपा, त्यामुळे वर्षानुवर्षे आपणाला त्यांच्याकडून व्यवसाय मिळू शकेल. ३) महत्वाची अशी मूल्ये जपा. ४) स्वत:वर विश्वास ठेवा. ५) छोटया-छोटया गोष्टीही नीट नेटकेपणाने करायला शिका. ६) स्वत:मधील उत्तम जाणून घ्या. ७) उत्तम ते द्यायला शिका.

एखाद्याला आपली शक्ती आणि कार्यशक्तीची जाणीव असणे म्हणजेच विश्वास होय. विश्वासानेच जीवनात यशाला वश करावयास शिकले पाहिजे. आपणा सगळ्यांकडे शक्ती आणि कार्यशक्ती असते त्यामुळे त्यांनी आपल्यातील उत्तमाची जाण करून घ्यावयास हवी. आपल्याला काय आवडते हे जसे महत्वाचे असते त्याचप्रमाणे आपण समाजासाठी काय विधायक करू शकतो, ह्याचीही जाण त्यांनी घ्यावयास हवी. ती जाण ठेवून जर कां त्यांनी आपले कार्य केले तर समाजाला ते फायदेशीर ठरू शकतात. अशा वेळेस त्यांनी गुणवत्तेवर तडजोड न करता कार्य करावयास हवे.

आपल्या जीवनात आपण गाठावयाचे ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते गाठण्याचा प्रयत्न करा. स्वयं शिस्त बाळगा. तुम्ही जे करीत आहांत, त्याचा आनंद उपभोगा. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या विषयात रस घेता त्याचवेळेस तुम्ही तुमची प्रगती विनासायास करू शकता.

याचे सगळ्यात चांगले उदाहरण म्हणजे सुहास गोपीनाथ ह्यांचे होय. बॅंगलोरच्या ह्या सुपुत्राने १४ वर्षांचा असतानाच ग्लोबल्स इन. हि जागतिक स्तरावरची कंपनी एका सायबर कॅफे मध्ये सुरुवात करून किंवा स्थापून जगातील सर्वात तरुण सी इ ओ होण्याचा मान मिळविला. आज हि कंपनी मल्टी मिलियन असून अमेरिका, भारत, कॅनडा, जर्मनी, इटली, इंग्लंड, स्पेन, ऑस्ट्रेलिया, सिंगापोर आणि मिडल इस्ट इत्यादी देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. अनेक मान-सन्मानांशिवाय ह्या छोटया वयाच्या मुलाला जागतिक बँकेच्या बोर्ड ऑफ द आय सी टी एडवायझरी कौन्सिलवर देखील नेमून त्याचा सन्मान करण्यात आला.

त्यानेच सांगितल्याप्रमाणे, “त्याच्या जीवनाचे ध्येय पैसे कमविणे हे नव्हते, तर तंत्रज्ञानाप्रती असलेली त्याची ओढ हे होते.” तसेच मायक्रो सोफ्टच्या बिल गेट्स पासून प्रेरित झाल्यामुळे त्याने नोकरीच्या आलेल्या संधी सोडून आपला स्वत:चा व्यवसाय करण्याचे व जागतिक पातळीवर जाण्याचे पहिल्यापासूनच ठरविलेले होते. ब-याच अमेरिकन कंपन्यांनी त्याला मिशी फुटलेली नसल्यामुळे काम नाकारले होते. त्याच्या मते कोणाहि व्यक्तीला त्याच्या शिक्षणावरुन किंवा त्याच्या वयावरून न पारखता त्याच्या कार्यावरून ओळखण्यात यावे. त्याच्या मते, पुस्तकी ज्ञानापेक्षा, प्रत्यक्ष ज्ञान (प्रक्टीकॅल) हे अतिशय महत्वाचे होय.

यासाठी कांही व्यवसायांमध्ये प्रात्यक्षिकांची फार गरज असते. तसेच व्यक्तिमत्व विकासाची सुध्दा गरज असते. आपल्या ग्राहकांशी तसेच आपल्या सहका-यांशी आपले संबंध विकसित करा. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींशी संबंध सुधारा. संवाद साधणे, मदतीचा हात पुढे सरसावणे, यामुळे व्यवसाय आणि संबंध वाढीला लागतात. व्यक्तींचे गुण पारखून त्यांची कदर केल्यास, त्यांच्याकडून चांगले कार्य घडते, घडविता येते किंवा त्यांच्याकडून ते करून घेता येते. हे सगळे साध्य करण्यासाठी पुढील गोष्टींचा आधार घ्या –

१)सकारात्मक व्यक्ति व्हा. २) सदा सत्य बोला. ३) निर्भीड रहा. ४) मोकळेपणाने बोला. ५) अदबीने किंवा नम्रतेने बोला. (त्यासाठी आपली संभाषणामध्ये कृपया (प्लीज), आभारी आहे (थेंक यु) अशा शब्दांचा आग्रहाने वापर करा.) ५) शब्द दिला असता, तो पाळावयास शिका किंवा आपला दिलेला शब्द कधीही खाली पडू देवू नका किंवा त्याचे अवडंबर सुध्दा माजवू नका. ६) माणसांना ज्यावेळेस तुम्ही पाहिले होते, त्यापेक्षा जास्त चांगली वागणूक देवून, त्याला बढती द्या. ७) मित्रत्वाचे नाते जपा व त्यांच्यावर प्रेम करा. त्यांची काळजी घ्या. त्यांचा आदर करा. ८) चांगले श्रोते व्हा. दुस-याचे म्हणणे शांतचित्ताने ऐकून घेण्याची सवय लावा. ९) भरपूर हसा आणि सगळ्यांना हसवा. १०) स्वत: आदर मिळविण्यासाठी, अगोदर दुस-यांना आदर द्यावयास शिका. तसेच इतरांचा किंवा लोकांचा आदर करा.

हे सगळे गुण अंगीकारल्याने तुमची मनात बाळगलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यास वेळ लागणार नाही.

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..