तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात….
आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही… आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून… या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात…. पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात…..
त्यातलाच एक तुम्हाला सांगतो….
काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत ठरला…. ऐनवेळी काजूच्या बागेतुन यायला ऊशिर झाला… मग घाईत बागेतुन आलो तसाच हाप पँट आणी टिशर्टवर गाडीत ड्रायव्हींगला बसलो….
वाटेत सौंच्या मैत्रीणीचे दुकान… शकूंतलाचे…10 वर्षापूर्वी तिच लग्न झालय अशी सौनी माहीती दिली.
मैत्रीणीचे दुकान म्हणजे खरेदी अपरिहार्य… पण सुदैवाने ती मला ऒळखत नव्हती… खाउची खरेदी झाल्यावर… तिला गाडीत कुणी ऒळखीचे वाटले… बघितले तर मैत्रीण…. मग मुलाला आणखी एखादा पुडा दिला बहुधा.. आणी आणखी गिऱ्हाईक नसल्यामुळे गाडीजवळ आली…. व ईकडच्या तिकड़च्या गप्पा सुरू झाल्या… मध्येच ती सौं ना बोल्ली,
“बघ गो कोन पोरग्या आसा तर भावाक… ”
ही खास ताकाला येऊन भांड लपवण्याची मालवणी स्टाईल….
मी मध्येत तोंड घातले….
“वो ताई माका पोरग्या बघा खय आसा तर”
तीचे डोळे अचानक चमकले बहुदा कुणीतरी मुलगी असावी पाहुण्यात….
तिने पटकन विचारले मैत्रीणीला….
“गो वय काय हेंचा? काय करतात? तुमच्याकडेच ड्रायव्हर आसत मा?
आणि आमच्यातलेच……… /जातितले/…….. मा?
आसा एक पोरग्या पण अपेक्षा काय?
एव्हाना “गाडी” गरम होउ लागली होती…. मला अंदाज आला पण ईलाज नव्हता .. ऊत्तर दिल्याशिवाय गाडी पुढे नेता येत नव्हती…
शेवटी सौनि ऊत्तर दिले…
” अपेक्षा काय नाय….. फक्त एक समोर आसा ती बायको…. आणि दोन पोरा संभाळुक व्हयी”
मी काहीही न बोलता गाडी चालू केली…. आणि शकुंतला वेड्यासारखी माझ्याकडे व सौकडे आलटुन पालटुन बघत होती
बापूर्झा.
डॉ. बापू भोगटे
Leave a Reply