नवीन लेखन...

स्वस्तिकाद्वारे चिकित्सा

आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे आहेत.

ठराविक आकाराचे व रंगाचे स्वस्तिक शरीरावर योग्य ठिकाणी लावल्यास आरोग्य सुधारते असे अनुभव आले. लाल स्वस्तिक छातीवर ठेवले असता कफ कमी होतो. थंडीच्या दिवसांत लाल स्वस्तिकावर बसले असता थंडी कमी वाजते. पिवळे स्वस्तिक माकाहाडला लावले असता संडासला साफ होते आणि वात कमी होतो. फिक्यानिल्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी, पित्ताचा त्रास कमी होतो. गर्द निळे स्वस्तिक बेंबीवर लावले असता पचन शक्ती वाढते. हिरवे स्वस्तिक उन्हाळ्यात टोपीमध्ये ठेवले असता उन्हाचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे अभ्यास करवून घेऊन “आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके” असे पुस्तक २००७ साली परमेश्वराने माझ्याकडून लिहून घेतले. ते वाचून अनेकांनी स्वतः स्वस्तिके तयार करून वापरली तर अनेकांनी माझ्याकडून स्वस्तिकाचे सेट नेऊन ती स्वस्तिके वापरली आणि त्यांना फायदा झाला.

स्वस्तिके शरीरातील सात चक्रांना किंवा अवयवांना आजाराप्रमाणे किमान दोन तास ते दिवसभर लावावीत. स्वस्तिकाची रंगीत बाजू शरीराला लागली पाहिजे.

आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. हि चक्रे आपल्या अवयवांना जोडली गेली आहेत. त्या प्रत्येक चक्राला एक ठराविक रंग आहे. एखादा आजार होतो म्हणजे त्या संबंधित चक्राचा रंग वाढतो किंवा कमी होतो. रंग कमी झाला की त्या रंगाचे स्वस्तीकाद्वारे तो रंग त्या चक्राला द्यायचा. तसेच रंग जास्त झाला तर त्याला मारक रंग देऊन रंग संतुलित करायचा. काहीवेळा दुसऱ्या रंगाचे आक्रमण झाल्यास त्याला मारक रंग देऊन नंतर त्या चक्राचा रंग द्यावा.

चक्रांचे रंग पुढील प्रमाणे-

मूलाधार चक्र-तांबडा

स्वाधिष्ठान चक्र-नारिंगी

मणिपूर चक्र-पिवळा

अनाहत चक्र-हिरवा

विशुद्ध चक्र-फिका निळा

आज्ञा चक्र-गर्द निळा

सहस्त्राधार चक्र-जांभळा

स्वस्तिकाला जे अधिकचे चिन्ह आहे. त्याची लांबी विषम संख्येत असावी. म्हणजे एक इंच, तीन इंच, सात इंच इ. स्वस्तिकांच्या भुजांची रुंदी लांबीच्या १० ते १२ टक्के असावी. स्वस्तिकाचे रंग इंद्रदानुष्याच्या रंगाशी मिळते हवेत. सध्या बाजारात उपलब्ध व्हायोलेट रंगात तांबडा रंग कमी आहे.तो जांभळा हवा. स्वस्तिक हे कागदावर (शक्यतो पांढरा), सफेद कापडावर, थार्मोकोलवर, पांढर्या प्लास्टिक शीटवर काढले तरी चालते. स्वस्तिक निट आखून घेऊन काढणे चांगले. यासाठी वाॅटर कलर, ऑईल पेंट, बाटिक पेंट, छपाई चे रंग व कोणत्याही प्रकारचे रंग चालतात. माझेकडे कार्ड पेपरवर छापून व लॅमिनेट करून घेतलेली स्वस्तिके तयार आहेत व ती चांगली उपयोगी पडत आहेत.

अरविंद जोशी
९४२१९४८८९४

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..