नवीन लेखन...

स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य कुठे?




भारत इंठाजांच्या गुलामगिरीतून मुत्त* झाला; स्वतंत्र झाला. बघताबघता या घटनेला 59 वर्षे उलटली. या 59 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंदाचा पहिला भर तर सुरुवातीच्या पाचसात वर्षांतच ओसरला. त्यानंतर स्वातंत्र्याच्या वास्तवाची खरी जाणीव व्हायला सुरुवात झाली. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून देशाची प्रगती करणे सोपे काम नव्हते. काटेकोर आणि वास्तवस्पर्शी नियोजनाची आवश्यकता होती. केवळ नियोजन करून भागणार नव्हते तर अंमलबजावणीची तत्पर जोड मिळणे तेवढेच गरजेचे होते. या पृष्ठभूमीवर आपल्या 59 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला तर सुस्पष्ट उत्तराऐवजी प्रश्नचिन्हांची मालिकाच उभी राहिलेली दिसते. या 59 वर्षांची उपलब्धी काय? या प्रश्नाचे उत्तर बराच विचार करून द्यावे लागते आणि ते समाधानकारक असेलच असे नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाची किंमत मोजणारी पिढी आता अस्तंगत झाली आहे. जे काही थोडेफार लोक उरलेत ते त्या काळच्या आठवणींवर दिवस काढत जगताना दिसत आहेत. आपल्या कष्टाला आलेल्या फळाची दुर्दशा त्यांना बघवत नाही. याजसाठी केला होता का अट्टहास? हा प्रश्न त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यांवर सहज वाचायला मिळतो. स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या लोकांना या 59 वर्षांनी निराशच केले आहे. यापेक्षा इंठाजांचे सरकार बरे होते अशी हताशा त्यांच्या बोलण्यातून जाणवते आणि ती खरीही आहे. स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्यांना स्वातंत्र्याची किंमत कळलेलीच नाही. ही सामान्य लोकांचीच अवस्था नाही तर देशाचा कारभार हाकणाऱ्या नेत्यांनाही स्वातंत्र्याच्या मूल्याची चाड राहिलेली नाही. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडे फडकविले, दिवसभर मोठ्या आवाजात देशभत्ति*पर गाणे
ाजविले की आमची देशभत्त*ी धन्य होते. त्यापलीकडे देशाचा विचार करण्यास कुणीही तयार नाही. कधीतरी शांतपणे बसून या 59 वर्षांच्या प्रवासाने देशाच्या शेवटच्या माणसाला काय दिले याचा विचार कुणी तरी

करतो का? ज्यांच्या थडग्यावर

बसून आम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा करतो त्या शांतपणे पहुडलेल्या शहिदांच्या स्वप्नांचा विचार कधीतरी आमच्या मनाला शिवतो का? स्वातंत्र्य मिळाले, पण कसले? मोर्चे काढण्याचे, संप पुकारण्याचे, निदर्शने करण्याचे, पुतळ््यांची विटंबना करून दंगली घडवून आणण्याचे, भ्रष्टाचाराचे की अजून कसले? स्वातंत्र्याचा वापर आपण याचसाठी करतो आहोत ना? देश बलवान व्हावा, देशाची प्रगती व्हावी, रोजीरोटीच्या काळजीने कुणीही व्याकूळ होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपले सरकार काय करते? इंठाजांच्या राजवटीत एका ईस्ट इंडिया कंपनीने भारत कंगाल केला. आज इंठाजांच्या जोखडातून मुत्त* झालेल्या भारतात काय चित्र दिसते? ईस्ट इंडिया कंपनीच्या बाप ठरतील अशा शेकडो परदेशी कंपन्या आज भारतात धुडगूस घालत आहेत. या कंपन्यांना चरण्यासाठी आपले कुरण कुणी मोकळे करून दिले? इंठाजांची राजवट जुलमी होती त्यांनी भारताचे शोषण केले यात वाद नाही; परंतु त्यांच्या राजवटीत उपासमारीला कंटाळून शेतकऱ्यांनी घाऊक प्रमाणात आत्महत्या केल्याचे कधी ऐकले नाही. शेतकऱ्यांच्या झोळीत हे फाटके नशीब आपल्याच लोकांनी टाकले ना? तेव्हा किमान शत्रू समोर दिसत होता, वेगळा ओळखू येत होता. कुणासोबत दोन हात करायचे हे स्पष्ट दिसत होते. स्वातंत्र्याने तर तीही सोय हिरावली आहे. परिस्थिती होती तशीच आहे, किंबहुना अधिक बिघडली आहे. बदल झाला तो केवळ कसायाच्या रंगरूपात! आधी गोरा होता, परका होता. आता आता तो आपल्याच वर्णाचा, आपल्याच तोंडवळ््याचा, आपल्यातलाच आहे. स्वातंत्र्याने बदल घडवून आणला तो इतकाच! आधी मूठभर इंठाजांची
आपल्यावर सत्ता होती. आता जे सत्तेवर आहेत ते सगळेच इंठाजाळलले आहेत. त्यांचा रंग तेवढा सावळा आहे. बाकी इतर कोणत्याही बाबतीत ते इंठाजांच्या तुलनेत तसूभरही कमी नाहीत. दीडशे वर्षांचा संघर्ष करून आपण केवळ ब्रिटिशांना हाकलण्यात यशस्वी झालो. त्यांनी येथे पेरलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक विषवल्लीला मुळासकट उपटण्यात आपल्याला कधीच यश आले नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की मुळात ती विषवल्ली आहे हे मानायलाच आम्ही तयार नाही. त्यामुळे ती उपटून फेकण्याचा प्रयत्न करण्याची गरजही आम्हांला वाटत नाही. आता सगळेच इंठाजाळलेले आहेत. आमची भाषा, आमची संस्कृती, आमचे प्रसारमाध्यमे अगदी सर्वच ‘इंठाजीशरण’ झाले आहेत. इंठाजांनी केवळ बाबू तयार करण्यासाठी अमलात आणलेली शिक्षणपद्धती आजही आम्ही मोठ्या अभिमानाने डोक्यावर मिरवीत आहोत. इंठाजांचे राज्य होते तेव्हा शासकीय कामकाजाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असे. सामान्यांना शासकीय कामकाजाची माहिती मिळत नसे. ते परकीय होते त्यामुळे त्यांनी तेवढी काळजी घेणे स्वाभाविकच होते; परंतु स्वकीयांच्या राजवटीतही ही गुप्तता पाळली जातच होती. माहितीचा अधिकार मिळविण्यासाठी स्वतंत्र भारतात सामान्यांना संघर्ष करावाच लागला. इंठाजांच्या राजवटीपेक्षा वेगळे असे स्वतंत्र भारतात काय आहे? वर म्हटल्याप्रमाणे केवळ निदर्शने करण्याचे स्वातंत्र्य आम्हांला मिळाले आहे काय? इंठाजांना भारताच्या प्रगतीची काळजी नव्हती आणि ती करण्याचे काही कारणही नव्हते. इंठाज गेल्यानंतर त्या परिस्थितीत कोणती सुधारणा झाली? प्रगतीचा मुद्दा निघाला की उपठाह, मोबाईल, संगणक क्रांती, मोटारगाड्यांची वाढती संख्या, शेअरबाजाराचा निर्देशांक, मोठी धरणे वगैरेंची यादी समोर ठेवली जाते. अहो, खेड्यापाड्यांतून राहणाऱ्या देशाच्या 80 टक्के जनतेला या सगळ््यांचा काय उपयोग?

त्यांच्या भाकरीचा प्रश्न आधी सोडवा. तुमच्या कृषिप्रधान देशात शेतकरीच टाचा घासून मरतो आहे त्याकडे आधी लक्ष द्या! त्या शेतकऱ्याला तुमचा मोबाईल नको, तुमच्या स्वस्त झालेल्या मोटारगाड्या नकोत, शेअरबाजाराच्या निर्देशांकात त्याला काही स्वारस्य नाही, धरणाच्या उंचीशी त्याला काही देणेघेणे नाही; त्याला हवे आहे ते केवळ त्याच्या घामाचे उचित दाम! त्याला जगायचे आहे ते स्वाभिमानाने आणि त्याची किंमतही खूप कमी आहे. तुमची तथाकथित प्रगती ही अल्पशी किंमतही त्याला देऊ शकत नसेल तर काय चाटायचे या स्वातंत्र्याला?

देशाच्या प्रगतीचा मानबिंदू देशातील शेवटचा माणूस असतो. या शेवटच्या माणसाची

दशाच देशाच्या प्रगतीची कहाणी सांगत असते. काय आहे आज त्याची दशा? सर्व पंचवार्षिक नियोजने पालथी घातल्यावरही आज त्याच्यासाठी पोटाची आग विझविणे हीच ज्वलंत समस्या असेल तर 59 वर्षांच्या प्रवासात आम्ही एक इंचही प्रगती केली नाही असेच म्हणावे लागेल. आम्ही फार तर एवढेच म्हणू शकतो की, 59 वर्षांपूर्वी भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. राजकीय स्वातंत्र्याचा संबंध आर्थिक, सामाजिक प्रगतीशी जोडला जात असेल तर भारत त्याला अपवाद ठरावा. उलटपक्षी इंठाजांच्या राजवटीत येथील शेतकरी अधिक सुखी होता असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. तेव्हा त्याच्या शेतीतून चिल्यापिल्यांसह सुखाने चार घास खाता येतील एवढे पीक तो सहज काढत असे. आज कितीही ढोर मेहनत केली तरी हाती काही लागत नाही. बाहेरून कितीही रंगरंगोटी केली तरी आतून शिकस्त झालेल्या इमारतीचे आयुष्य वाढत नसते. आपली प्रगती या बाहेरच्या रंगरंगोटीसारखी आहे. या देशाचा पाया असलेला शेतकरी आतून खचत आहे हा पाया कधी कोसळला तर प्रगतीचे सारे इमले जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही. स्वातंत्र्यासाठी हसतहसत मरणाला कवटाळणाऱ्यांच्या स्वप्नातील भारत असा न
्कीच नव्हता. त्यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला उभा करायचा असेल तर एका नव्या स्वातंत्र्ययुद्धाचा बिगुल आता वाजवावा लागेल. देशाला भ्रष्टाचार आणि बेइमान लोकांच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी मोठा लढा द्यावा लागेल. कदाचित अजून काही पिढ्या या युद्धात कामी येतील परंतु एक दिवस असा नक्कीच येईल की, लाल किल्ल्यावर तिरंगा खऱ्या अर्थाने डौलाने फडकेल. तसा तो आजही फडकतो आहे; परंतु ते फडकणे नव्हे तर फडफडणे आहे. कारण त्याला ठाऊक आहे की, स्वातंत्र्याचा वारा या देशाच्या गावकुसात अद्यापही शिरलेला नाही. प्रा. ज्ञानेश वाकुडकरांच्या शब्दांत सांगायचे तर –
‘स्वातंत्र्या,
माहीत नाही तुझी नक्की कोण लागत होती
पण भगतसिंगांची माय परवा भीक मागत होती
तिचाही पोरगा वेडा होता,
तुझ्याचसाठी मेला
मरता मरता आईला अनाथ करून गेला
त्याच्याही कानात भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे स्वातंत्र्या, निदान त्यांच्या घरी तू जायला नको का रे?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..