गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे.
त्यावर आता तू. तुझा असा स्वतंत्रपणे अभ्यास कर आणि नक्की काय करायचे ते तु ठस्व म्हणजे निर्णयाचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी सुद्धा अर्जुन येते. तीन अनेकाच्या मातेच सोडवावी स्थाबद्दल विद्वानांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, काही तज्ञ मदतीला आहेत. चर्चा सुरु होते. ज्या व्यक्तीला समस्येची उकल हवी आहे त्याच व्यक्तीवर पूढे हे solution प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आहे. हे सारे साधणारा असा हा साधक आहे. साधकाचा अभ्यास सुरु होतो. कोणतीही भूमिका आंधळेपणाने घ्यायची नसते. पडताळा पहायचा आसतो. स्वतःचे बौद्धिक स्वातंत्र्य वापरुन खूप शंका उपस्थित करायच्या असतात, प्रसंगी वादविवादही करायचे असतात.
समोरच्या समस्येची उत्तर देणारी व्यवस्था (system) आता तयार होऊ लागते त्याचे प्रयोग सुरु होतात. हळूहळू (Road map) म्हणजे ‘उकलमार्ग आकार घेऊ लागतो. आता हा मार्ग पूर्ण होऊ लागतो कागदावर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करायची वेळ आली आहे. आता शंका प्रश्न उपस्थीत करण्याचे स्वातंत्र संपले. आपल्या बुद्धी, विवेकावर आधारीत निर्णयालाचं नम्रपणे शरण जाणे आणि काया-वाचा-मने त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे compliance. स्वतःच्या सर्व भूमिका सोडून आपण तयार केलेल्या समान आणि सर्वांगीण भूमिकेप्रती शरण ये असे श्रीकृष्ण सांगतात तेव्हा ती ‘व्यक्तीशरणता’ नाही तर ‘सिद्धान्तशरणता’ असते. निव्वळ स्वातंत्र असेल तर शिस्तबद्ध व्यवस्था तयार होणार नाही. फक्त ‘हुकुमाची तामिली’ म्हणजे compliance असेल तर यांत्रिक गुलामीची कृती होईल.
– डॉ. आनंद नाडकर्णी
Leave a Reply