स्वतःशी बोलायला हवय .
हो,नितांत गरज भासतेय माला त्याची.स्वतःला अपयशी समजते मी.
मी मलाच विचारलं पुन्हा,अपयश कशाला म्हणावं ,त्याची व्याख्या आहेतरी काय?
दुसऱ्याला काय वाटतं ,ह्याचा नकोस ना करू विचार.
फक्त आणि फक्त स्वत:साठी जगणं,म्हणजे का जीवन?
पुन्हा मीच मला प्रश्न विचारला.
मीच माझ्याशी साधलेला संवाद मला अंतर्मुख करीत होता.दोलायमान मनस्थिती कुठतरी संतुलीत झाली आहे,याची खात्री पटली मला.
माझ्यातली बंडखोर मी,
दुर्मुखलेली मी अडगळीत टाकायचीय मला.
काय करावे?
काय केले म्हणजे सकारात्मकता वाढीस लागेल,ह्यावर माझाच मी माझ्याशी मुक्त संवाद साधला.
खरच सांगते ,मनानी मनाशी;स्वत:स्वतःशी साधलेला आजचा संवाद मला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवतोय.
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply