स्विगी.! झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी..! १४ ऑगस्ट २०१४ ला सुरु झालेली ही कंपनी. अल्पावधीतच ग्राहकांच्या लोकप्रियतेला पात्र ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची स्थापना नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्ष मजेती या तिघांनी केली. यातील नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती हे दोघे बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीचे विद्यार्थी.
या दोघांनी ‘बंडल’ नावाची कुरिअर लॉजिस्टिक्स कंपनी सुरु केली. वर्षानंतर लोकल हॉटेल व्यावसायिकांशी जोडुन फुड ऑर्डर डिलिव्हरीची सुरुवात केली. आयआयटी खरगपूर येथे शिकणाऱ्या राहुल जेमिनी यांच्याशी या दोघांची ओळख झाली. राहुल हे ‘मिंत्रा’चे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती. असे तिघे मिळवून स्विगी चालवू लागले.
स्विगीवर बिर्याणी, बटर नान, फ्राइड राईस हे पदार्थ सर्वाधिक मागविले जातात. ५७% ऑर्डर्स वेब तर ४३% ऑर्डर्स या अॅइपच्या माध्यमातून दिल्या जातात. स्विगीच्या एका आकडेवारीनुसार ५५,०००+ हॉटेल्स, १,२०,०००+ डिलिव्हरी पार्टनर्स, ५,०००+ मनुष्यबळ कार्यरत आहेत. आज स्विगी कंपनीचे बाजारमुल्य ३.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. अॅसपचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते जगभरात आहेत. १५ हुन अधिक आर्थिक संस्थांनी भांडवल स्वरूपात १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा अधिक मदत केली आहे.
स्विगीच्या अॅीपमध्ये मुख्य गोष्टी तीन. पहिली ग्राहक, दुसरी डिलिव्हरी पार्टनर्स, तिसरी हॉटेल्स!
५००० ते ७५०० ग्राहक प्रतिदिन या अॅयपवर फुड ऑर्डर करतात. ग्राहकांना वेगवेगळे कॅशबॅक देऊन आकर्षित केले जाते. ग्राहक त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे ऑर्डर करू शकतो. मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर्स दिल्या जातात. अॅडपवर येणाऱ्या ऑर्डर्समधून ग्राहकाचा खाण्यापिण्याचा ट्रेंड शोधला जातो. त्यानुसार पुढील वेळी त्याच्या आवडीच्या हॉटेलचे अन्नपदार्थ स्क्रीनवर दाखवले जातात. ग्राहकांकडून किरकोळ स्वरूपात डिलिव्हरी चार्जेस आणि पॅकेजिंग चार्जेस आकारले जातात. जर आपण प्रीमियम सभासद असाल तर हे चार्जेस आकारले जात नाहीत. सांगलीत जवळपास ४०० हून अधिक युवकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामध्ये तरुण वर्गापासून आबालवृद्ध लोक कार्यरत आहेत.
पार्ट टाईम तसेच फुल टाईम अशा वेळेत काम करू शकता. जॉबला लागल्यानंतर सर्वसाधारणता १,००० रु. भरावे लागतात. (दोन्ही कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत.) दर आठवड्याला कामाचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होतात. फुल टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ८,००० ते रु. १५,००० दरम्यान पगार मिळतो. पार्ट टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ६,००० ते रु. ११,००० दरम्यान पगार मिळतो.
ऑर्डर्स ऑनलाईन येत राहतात. त्याप्रमाणे त्या स्वीकारून हॉटेलमधून घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जातात. हॉटेल्सकडून या कंपन्या १०-२५% कमिशन चार्ज आकारतात. हॉटेल चालकांना एकसलग ऑर्डर्स मिळतात म्हणून ते देखील आनंदाने पैसे देऊ करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply