स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. व्यायाम केल्याने शरीर फिट राहते. थकवा दूर झाल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. स्विमिंग करताना आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. त्यामुळे स्विमिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
1) लहान मुलांना उत्तम पोहता येत असले तरी त्यांना स्विमिंग पुलामध्ये एकटे जाऊ देऊ नये. त्यांची एक चूक ही मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते. 2) जेवण झाल्या- झाल्या पोहण्यासाठी जाऊ नये. आपले शरीर जेवणानंतर दोन तासांनी पोहण्यासाठी तयार होत असते. 3) पोहण्याअगोदर दारू, धूम्रपान आदींची नशा करू नये. 4) स्विमिंग करताना च्यूइंगम, टॉफी किंवा कुठलाही पदार्थ खाऊ नये. 5) स्विमिंग शिकणारांनी जास्त खोल पाण्यात जाणे टाळावे. 6) स्विमिंग करण्याअगोदर आणि नंतर शॉवर घेणे गरजेचे आहे. 7) स्विमिंग करण्याआधी शरीराला वॉर्मअप करणे जरूरी आहे. 8) सुरुवातीला डोक्याला पाण्यात टाकावे आणि काढावे. याने श्वास घेण्याची शक्ती वाढते व स्विमिंग शिकण्यास मदत होते. 9) स्विमिंगपूलमध्ये पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक आहे. 10) सुरुवातीला 30-40 मिनिटापर्यंत पोहणे चांगले असते.
— संदीप रमेश पारोळेकर
Leave a Reply