नवीन लेखन...

कर्करोगाची लक्षणे (भाग १)

स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग नियमितपणे स्तनांची चाचपणी केल्यास स्वतःलाच कळून येतो. दोन्ही स्तन व स्तनाग्रे हाताने चाचपल्यास कर्करोगाची नुकतीच तयार झालेली गाठ प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येते.

कधी कधी अन्न गिळताना अचानक अन्ननलिकेत अडथळा होतो. अन्ननलिकेत कर्करोगाची गाठ झाल्यास अन्न घशातून पुढे सरकत नाही. असे झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरीचे ठरते. क्वचित शरीरातील आतील भागात उदा. जठर किंवा आतड्यात (अल्सर) तयार होतो. या प्रकारचे बरे न होणारे अल्सर कर्करोगाचे द्योतक असतात. त्वचेवर असलेला तीळ किंवा मसा अचानक पसरू लागला तर | त्याची दखल घेणे आवश्यक आहे.

सतत होणारे अपचन, मलमूत्र विसर्जनाच्या स्ववयीतील | बदल उपचाराने बरी न होणारी बद्धकोष्टता, शौच्यातून जाणारे रक्त आदी आतड्याच्या तक्रारी कर्करोगाचे द्योतक असू शकतात. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी किंवा मासिक पाळींच्या मधल्या काळात बराच रक्तस्राव होतो. ही लक्षण गर्भाशयाच्या मुखाच्या किंवा गर्भाशयाच्या आतील अस्तराच्या कर्करोगाकडे बोट दाखवते.

औषधेपचाराने बरा न झालेला घोगरा आवाज स्वरयंत्राच्या कर्करोगाचा द्योतक असू शकतो. वरील शारीरिक बदल इतर कारणांमुळेदेखील होतात त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास कर्करोग निश्चित झाला आहे, असे मानून खचून जाणे उचित नाही.

परंतु वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. थोडक्यात म्हणजे शरीरात, स्तनात अथवा कोठेही दीर्घकाळ वाढणारी गाठ अथवा भरून न येणारा व्रण. अन्न गिळताना सतत अन्ननलिकेत होणारा अडथळा. अपचन, विसर्जनाच्या सवयीतील बदल. दोन मासिक पाळींमधील मलमूत्र अनैसर्गिक रक्तस्राव, शौच्यातून किंवा लघवीतून होणारा, रक्तस्राव. तीळ अथवा मसा यात होणारी अनैसर्गिक वाढ. सतत येणारा खोकला. दीर्घकाळ राहणारा आवाजातील घोगरेपणा. ही लक्षणे कर्करोगाच्या धोक्याचे कंदील ठरू शकतात.

-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..