नवीन लेखन...

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

प्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं. मात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते. डिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागणे एकवेळ समजू शकते. मात्र तुम्हांला ह्या व्यतिरिक्त कायमच सतत भूक लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचे आहे.

सतत भूक लागण्याची कारणं आणि आजार 
१. मधुमेह – 
भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. मधुमेह हा आजार हल्ली सगळ्याच वयोगटामध्ये झपाट्याने वाढत चाललेला दिसून येत आहे. हल्लीच्या बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढलेला असून सतत भूक लागणं हे मधुमेहातील काही लक्षणांपैकी एक लक्षण असून त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब स्वतःची वैद्यकीय चाचणी करून घ्यावी.
२. अनियमितपणे जेवणे –
अनियमितपणे जेवणे ह्यालाच वैद्यकीय भाषेत इटिंग डिसऑर्डर असे म्हटले जाते ज्यात, ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे अशी व्यक्ती संपूर्ण दिवसभरात अनियमितपणे खाते. कधी कधी तर खायचा अंदाज न आल्याने व अति खाल्ल्याने अनेकदा अशा लोकांना उलटीचा त्रास देखील होतो. अशी व्यक्ती खाण्याच्या बाबतीत खूपच गोंधळलेली असते, त्या व्यक्तीला कधी काय खावं हे कळतच नाही.
३.पोटात जंत होणे –
जर तुमच्या पोटात जंत झाले असतील तर तुम्हांला सतत भूक लागू शकते. कारण जंत हे परजीवी असून ते आपल्याच पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं सातत्याने शोषून घेतात. यामधूनच शरीरामध्ये फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या कालांतराने बळावू लागतात.
४. औषधं – 
जर तुम्ही सतत काही औषधे घेत असाल तर अशा औषधांमुळेही सतत भूक लागू शकते. म्हणूनच आपल्या रोजच्या औषधांबरोबर जर काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आपण केलेत तर आपल्या औषधांची मात्रा निश्चितच कमी होऊ शकते.
५. ताण तणाव –
ताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्ती बहुतेकवेळा अनियमितपणे जेवण घेतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावून त्याचा थेट परिणाम मेंदूवर ताण येण्यावर होतो. अशामुळे भूकेचं प्रमाण वाढू शकते. म्हणूनच स्वतःला शक्यतो ताण तणावापासून दूर ठेवा, त्यासाठी व्यायाम, ध्यान किंवा एखादा आवडता छंद जोपासा, जेणेकरून तुम्हाला तणावापासून दूर राहता येईल.
— Sanket R Prasade
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

1 Comment on सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

  1. Dr mala satat bhuk lagte ani jevayla potbhar hot Nahi ultisarkh hot
    Tasach mala ratri khup tahaan lagte ani ghasa khup sukhto mi khup Pani pite tyamule mi satat ratri utthe..
    Plz.mala hyaver upaay sanga

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..