नवीन लेखन...

टाच दुखी

एच.आय.व्ही. किंवा हिपेटायटिस बी हे आजार पन्नास वर्षांपूर्वी कुणाला माहिती नव्हते. आजकाल हे आजार माहिती झाले. त्यावर संशोधन चालू झाले आणि काही प्रमाणात आटोक्यात आणण्यापर्यंत यश पण मिळते आहे. तसाच एक नवीन आजार आजकाल फार वाढलेला दिसतो. तो आहे “टाच दुखणे”. हा आजार खूप जुना फक्त आजकाल प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते. टाचदुखी काही जीवघेणा आजार नाही म्हणून त्यावर फारसे संशोधन करण्याची धडपड फारशी कोणी करत नाही. पण ज्याची टाच दुखत असते त्यालाच समजते की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते.

ही टाच दुखी आजकाल का वाढली आहे? त्याला कसा आळा घालता येईल? पेन किलर औषधे न घेता फक्त काही सवयी बदलून टाच दुखीवर कसा इलाज करता येईल? ह्या सर्व प्रश्नांचे “अनुभविक बोल” समजून घेऊया.

पूर्वी ज्यांच्या घरी फ्रीज आहे ते श्रीमंत समजले जात. आजकाल फ्रीज म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू बनली आहे. फ्रीजचा आणि टाच दुखीचा काय संबंध असा विचार आता आपण नक्कीच सुरु केला असेल. लहानपणा पासून आपण बघत आलो आहोत की कुठेही दुखत असेल तर शेकण्यामुळे बरे वाटते. खेळता खेळता चेंडू जरी डोळ्याच्या आसपास लागला तर लगेच खिशातून रुमाल काढून तोंडाच्या वाफेने थोडी ऊब निर्माण करुन लगेच डोळ्यावर धरतात हे आपण बघितले असेल. पाठ दुखी, कंबर दुखी होत असेल तर गरम लाईट किंवा रबरी पिशवीतून गरम पाणी भरुन शेकण्यामुळे आराम पडतो हे आपण नेहमी अनुभवतो. म्हणजेच उष्णता ही वेदना घालवते ह्या उलट थंड पाण्यामुळे वेदना वाढते हे समजले पाहिजे. थंड गार सरबत किंवा पाणी पिताना दातांमध्ये कळ येते हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मग त्या थंड पाण्यामुळे शरीरात इतर ठिकाणी वेदना होणं शक्य आहे हे आपल्याला का लक्षात येत नाही.

उत्तरेकडे अती थंडीच्या वातावरणात चालता चालता हाता-पायाला जरा धक्का लागला तरी किती जोरात ठणका लागतो. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आमच्या लहान पणी वडील एप्रिल-मे महिन्यात आम्हाला आईसक्रीम खायला घेऊन जात त्या काळात आईसक्रीम हा पदार्थ फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत खायचा असतो असे आमच्या डोक्यात ठाम बसले होते. आजकाल कोणताही ऋतु असो, अगदी धो धो पाऊस कोसळत असला तरी आणि कडाक्याची थंडी असली तरी “आईसक्रीम चालते.” फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांच्या मनात कोण भरुन देते हेच कळत नाही. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि जोडीला टाचा दुखणे चालू होते. हा विचार सांगितल्यावर काही विद्वान म्हणतात, “आम्ही इतके वर्ष फ्रीजचे पाणी पितो, तेव्हा काही नाही झालं, मग आता का?” ह्याचं उत्तर काहीही कुपथ्य केलं तर शरीर दीर्घकाळ पर्यंत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतं. आणि एक वेळ अशी येते की शरीर संपावर जातं अत्याचारांना साथ देणं सोडून देतं.

ह्याचा दुसरा भाग म्हणजे थंड पदार्थ अति प्रमाणात वारंवार घेण्यामुळे वजन वाढते. वाढलेल्या वजनाचा सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल गुडघे नंतर कंबर व शेवटी मणके. गरज नसताना उगाचच पाणी पिण्यामुळे हे पाणी हाडांच्या भागात जास्त ओलावा निर्माण करतात आणि हाडांमध्ये सूज येऊ लागते. हा प्रकार समजण्यासाठी पावसाळ्यात लाकडी दरवाजे कसे फुगतात ते आठवून पहा. ओलावा वाढला की लाकूड जसे फुगते तशीच हाडे पण फुगतात, म्हणजेच सुजतात अशा वेळी आपण कोणतेही पेन किलर औषध घेतले की वेदना कमी होते. पण औषधाचा परिणाम होताना भरपूर घाम येतो म्हणजेच शरीरात ठोसलेलं जास्तीचं पाणी औषधाने बाहेर फेकून देण्याची क्रिया होते. हे उदाहरण देण्याचे प्रयोजन फक्त विषय समजण्यापुरते नव्हे तर हा प्रयोग असंख्य रुग्णांच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे. पूर्वीच्या काळी “संध्या” करण्याची पद्धत होती. ह्या संध्येच्या पद्धतीमध्ये पळी पळीने घेऊन आचमन आणि काही मंत्रोच्चानकरण्याची पद्धत होती. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी संध्या करावी अशी शिकवण होती. म्हणजेच सूर्यास्तानंतर जास्त पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे असा संकेत होता.

फ्रीज सारखा दुसरा टाचांचा शत्रू म्हणजे ए.सी. वेदना शामक गोळी घेतली की घाम येतो ह्याचाच उलट अर्थ असा की घाम येण्याचे थांबवणारी क्रिया वेदना वाढवण्यास कारण होते. मग हे सर्व टाळण्यासाठी काय करता येईल? वातानुकुलित ऑफिस, घर,गाडी असताना कसलाच वापर करायचा नाही का? ह्याचे उत्तर “वापर जरुर करावा पण मर्यादेत”. दिवसातून वीस तास आपण जर ए.सी. मध्ये असाल तर किमान ४० मिनिटे असा काही व्यायाम करा की ज्यामुळे आडवून ठेवलेला सर्व घाम औषधाशिवायचबाहेर पडेल. स्टीम, सोना हे प्रकार करण्यासही हरकत नाही पण बॅडमिंटन, टेनिस, सायकलिंग सारखा व्यायाम केला तर तसा घाम तर बाहेर पडेलच पण सांधे पण लवचिक राहतील.

टाचदुखीमुळे चालणं फिरणं कमी होते, परिणामी व्यायाम कमी होतो आणि वजन वाढू लागते. वाढलेल्या वजनाचा परिणाम सर्व प्रथम टाचांवर होऊ लागतो. म्हणून थोडा व्यायाम नियमित करण्याची सवय ठेवावी.

१) टाच दुखी ताबडतोब थांबवण्यासाठी सहन होईल इतक्या गरम पाण्यात मीठ टाकून १० मिनिटे पाय बुडवून बसावे.

२) फ्रीज शी चक्क कट्टी करावी.

३) कोल्ड ड्रिंक किंवा आईसक्रीम फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत घेण्याचे पदार्थ आहेत असे समजावे.

४) “बर्फ” हा शब्द पण उच्चारु नये.

५) सूर्यास्तानंतर पाणी किंवा थंड पदार्थ घेण्याचे टाळावे.

६) ए.सी. चा वापर जेथे टाळता येणे शक्य नाही तेथेच करावा.

शांतपणे विचार केल्यावर लक्षात येईल की ह्या गोष्टींचा वापर ह्या सवयी गेल्या २५ वर्षांत अति प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून वाढते आहे टाच दुखी.

— आर.बी.पाटील
संयोजक
फिटनेस मूवमेंट ऑफ़ इंडिया

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..