नवीन लेखन...

ताल से ताल मिला (मी आणि ती)

ताल से ताल मिला हे गाणे लागले होते आणि त्याच नादात घरातून भर पडलो.
वळणावरच मला दिसली जणू माझीच वाट बघत होती तिला रिक्षा हवी होती.
मी स्कुटरवर , म्हणालो ड्रॉप करतो.
मनातच म्हणालो आधीच तू मला काही वर्षांपूर्वी ड्रॉप केले होते.
खरे पहाता मला बघून ती हबकली होती , तिच्या चेहऱ्यावर दिसत होते, डोळयांवर गॉगल होता , नीट कल्पना आली नाही.
काय इकडे कुठे , नाही सहज समोर बँकेत आले होते ,
चल बस स्कुटरवर जास्त नखरे नको , मी म्हणालो,
क्षणभर तिने पाहिले आणि बसली स्कुटरवर,
कुठे सोडू मी म्हणालो ,तशी ती म्हणाली ‘ उपवन ‘.
मी चमकलोच , खरे तर पूर्वी आम्ही तेथे भेटत असू.
तिथे रहातेस , मी म्हणालो .
चल ना उपवनला , प्रश्न नको.
मी समजलो ‘ समथिंग डार्क इन ब्लॅक ‘ .
आम्ही पोहचलो तेथे. कँटिनसमोरच्या खुर्च्यांवर बसलो.
ती गप्पच.
ती पटकन म्हणाली ‘ लग्न करशील माझ्याशी ‘.
मी तीनताड उडालो . अरे तुझे झाले ना.
ती म्हणाली , सहा महिन्यापूर्वी बोंबलेले,
नाही पटले आमचे दोघांचे , कशाला डोक्यावर डोकी आपटायची .
माझे लग्न झालेले नव्हते.
कारण कुठली मुलगी बघण्यास गेलो की डोक्यात हीच .
दिसायलाही जबरदस्त होती , आताही तशीच आहे.
हे बघ आपण काही दिवस बोलू आणि मग ठरवू, ती चालेल म्हणाली.
त्या दिवशी जवळ जवळ ३ वर्षांनी खूप गप्पा मारल्या.
मला वाटते आमचा ताल आता परत जुळणार आणि जुळले देखील.
बरीच चर्चा केले दोघेही कमावते होतो, दोघांच्या जागा होत्या.
आम्ही लग्नानंतर एक ठरवले आपण शनिवारी , रविवारी भेटायचे,
एकत्र रहावयाचे , बाकी च्या वेळी आम्ही आमच्या कामात.
तसेच केले आणि जाणवले
‘ ताल से ताल मिला ‘.
कारण ओढ काय राहिलीय.
हळूहळू एकत्र आलो.
गम्मत आहे की नाही.
एक मात्र जाणवले पहिल्या वर्षात आपण
एकमेकांना नको तेव्हडे कळलो तर प्रॉब्लेम होतो.
ह्याचा शोध मात्र लागला.
आज , अजून तसेच आहोत ,
एकमेकांची स्पेस संभाळून …..

सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..