नवीन लेखन...

तडजोड

एका बसमधून प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक थांब्यावर बस काही प्रवाशांना उतरवत असते तर काही नवीन प्रवाशांना सोबत घेत असते. त्या बसमधे एक तरुण मुलगी एका सीटवर बसलेली असते. तिच्या शेजारची सीट मोकळी असते.

एका बसस्टॉपवर एक बाई बसमधे चढते. ती बाई अवाढव्य असते. तिच्या हातात अनेक पिशव्या असतात. त्याही तिच्या सारख्याच अवजड असतात. ती बाई नेमकी या तरुण मुलीच्या शेजारी येऊन धपकन बसते. त्या मुलीला एवढा मोठा धक्का मारते की ती मुलगी आपोआपच बाजूला सरकते. त्या दरम्यान तिच्या अवजड पिशव्या मुलीच्या पायाला लागतात. मुलगी वेदनेने कळवळते. त्या बाईला मात्र आपण केलेल्या चुकीचे भान नसते. ती आपल्याच नादात असते.

पलिकडल्या सीटवर बसलेला एक तरुण मुलगा हे पहात असतो. त्याला त्या तरुण मुलीची कींव येते. तो मनातून त्या जाड बाईच्या वागण्यावर संतापलेला असतो. तो विचार करतो की ही मुलगी त्या बाईला चार शब्द का सुनवत नाही? ती थंड बसली आहे हे बघून तो त्या मुलीशी बोलू लागतो.

“अहो, त्या बाईने तुम्हाला ढकलले, तिच्या सामानाने तुमच्या पायाला लागले तरी तुम्ही तिला काहीच बोलला नाहीत. तिला असे करण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही तिला बोलला नाहीत तर तिला आपली चूक कळणार कशी? तुम्ही बोलणार नसाल तर मी तिच्याशी बोलतो.”

ती मुलगी प्रेमभराने त्या मुलाकडे पहाते. त्याने आपल्यासाठी त्या बाईशी शत्रूत्व घ्यायची तयारी केली हे बघून तिला गम्मत वाटते. ती मान झुकवून त्याचे आभार मानते. ती त्याला म्हणते “असू दे, त्या बाईने बरोबर केले नाही हे मला माहित आहे. पण प्रवास तर छोटासा आहे. त्यात कशाला भांडण तंटे करायचे? ”

तेवढ्यात पुढचा स्टॉप येतो. ती मुलगी बसमधून उतरुन जाते. या गोष्टीच्या निमित्ताने मला असे वाटले की त्या मुलीची विचारसरणी आपणही अवलंबायला काय हरकत आहे? आपल्या सगळ्यांचाच या जीवनातला प्रवास छोटासा आहे. मग त्यात भांडण तंटे, द्वेष, राग, मत्सर, असूया हे सगळे हवे कशाला? प्रवास छोटासाच आहे आणि आपल्यापैकी कोणाला कुठे उतरायचे आहे, कधी उतरायचे आहे कोणालाच माहित नाही.

आपल्याला त्रास देणाऱ्या, दुःख देणाऱ्या लोकांबरोबर थोडी सहनशीलता दाखवायला आणि त्यांच्या बरोबर थोडीशी तडजोड करायला काय हरकत आहे? शेवटी प्रत्येकाला आनंदाचा, सुखाचा प्रवास असावा एवढीच ना अपेक्षा असते?

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..