नवीन लेखन...

‘मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात. […]

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित पैलूंचं दर्शन – रिंगणाबाहेरून

‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला […]

सत्यजित रे यांची बायको

चित्रपट जगप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांची पत्नी बिजोया रे तिने आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्या २००३ ते २००४च्या दरम्यान ‘देश’ या बंगाली मासिकातून ३७ भागात क्रमशः प्रकाशित झाल्या. नंतर त्या पुस्तकरूपात बाजारात आल्या. […]

बॅड बॉसेस

तुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण. […]

OK – वय वर्षे १७५

हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला . […]

डॉ. बच्चन यांचा ‘मॅक्बेथ

अशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. […]

आपल्या आहारातील युती आणि आघाड्या

एका बाबतीत बदल झालेला दिसत नाही. ती बाब म्हणजे निसर्गाशी मानवाचे सातत्याने चाललेले द्वंद्व. थंडी-वारा-पाऊस असो वा त्सुनामी-वादळ – भूकंप असो, निसर्ग मानवाला चकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानव निसर्गाला जोखण्याच्या अभ्यासात असतो… आधी – व्याधी असो, रोगराई असो वा जीवजंतू असो, मानवाच्या निरामय आरोग्यातील हे अडथळे ओलांडण्याच्या करामती मानवाने अनेक करून दाखविल्या आहेत. […]

आडनावांच्या गमती जमती

 एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना! […]

स्मरणशक्ती

मेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे . […]

एकेकाचे खाणे

रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..