ब्रोकोली
ब्रोकोलीचा जन्म साधारण दोन हजार वर्षापूर्वी इटलीमध्ये झाला. ब्रोकोली ही हिरव्या रंगाची असते व आपल्या फुलकोबीप्रमाणे दिसते. रोम संस्थानिक ब्रोकोली लावत असत. ब्रोकोलीनंतर इटलीमधून युरोपात आली. व नंतर अमेरिकेकडे वळली. अमेरिकेत गेल्यावर डॉ.जे.टी.स्मिथ यांनी ब्रोकोलीचे संपूर्ण पृथ्थकरण केले व ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त आहे असे जाहीर केले. […]