नवीन लेखन...

वातावरणाची निर्मिती

वातावरण ते निर्मित होते,  जसे जातां वागूनी हर कृतिची वलये बनती, तरंगे ती निघूनी…१, फिरत असती वलये तेथें,  सारी अंवती भंवती चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जवळून जाता दुष्ट व्यक्ती ती,  आपल्या शेजारूनी चलबिचल ते मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरिरी, […]

पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे   बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे   कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता   शिवीगाळ तो स्वभाव असतां   आदरभाव तो कसा मिळे शत्रुत्वाचे नाते ठेवतां   […]

मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती ती,  मंद मंद प्रकाश देवूनी अंधकार भयाण असतां,  भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं असूनी ज्योत मिणमिणती,  त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला,  भरपूर पडल्या प्रकाशाचे मेणबत्तीची ज्योत आम्हांला, शिकवी साधे तत्त्व जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येती, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असती…१, ह्या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही….२, हेच तत्त्व त्या प्रभूचे,  तीन गुणांनी बनला, उत्पत्ती लय स्थीती,  यांनी सर्वत्र व्यापला…३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे…४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती […]

वेळेची किमया

वेळ येता उकलन होते,   साऱ्या प्रश्नांची जाणून घ्या हो थोडे तुम्ही,  रीत निसर्गाची…१, जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी, वेळ नसे योग्य आली,  हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां,  यश ना मिळे कांहीं काळासाठी थांबवा,  प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती,  पुनरपि सारे, उकलन होवून गुंत्यांची,  आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल,  ह्या […]

कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो भाव तरंगाना आकार देवूनी,  शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराश मी झालो निरर्थक तो वेळ दवडिला,  हेच मनी समजलो….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]

जीवनाची उपयोगिता

दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जी जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरिर कुणाला, मना मारूनी बसावे लागे,  ईश्वरी नाम घेत सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून मोठे प्रसंग आम्ही टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो, जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता ढोबळतेचा विचार होतो,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो, मृत्यू येई तो हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला गेला क्षण तो परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई, समाधान जे मिळे तुम्हाला,  देता किंमत प्रत्येक क्षणाला […]

लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला,  विनवितो मी तुझाच पूत्र, बाबा माझे नसती हयात,  कोण मजला ह्या जगतात, ‘केशव’ माझे वडील असता,  ‘केवशसूत’  हा ठरतो मी, तसाच बनता  ‘केशवकुमार’,  मोठे होण्याची युक्ती नामी जगावयाचे जर मोठ्या नामी,  तूच मजला महान आहे ‘लक्ष्मी’  तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

आयुष्य वाया घालू नका

दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण तो येईल कसा….१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान ते असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा….२, इच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन….३, जेंव्हां तुम्ही सेवा करिता,  इतर मनाचे भाव जाणूनी तेच […]

1 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..