नवीन लेखन...

 ध्यान स्थिती

जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी, […]

 व्यर्थची यात्रा

जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  । कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम, […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,   प्रभूसी मी विनविले  ।। १   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,   काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,   घेण्यास ते समजून  ।।२   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,   बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,   वस्तूच्या त्या गुणापरी  ।।३   सारे सजिव निर्जिव वस्तू,   गुरू सारखे वाटावे तेच […]

गोठ्यातील अमृत

एके दिवशी प्रात:काळी,  क्षीरपात्र घेवून हाती धेनूचे ते दूध आणावया,  गेलो गोठ्यावरती बघूनी तो अवाढव्य गोठा,  चकित झालो गाई वासरातील प्रेम देखूनी,  मनी आनंदलो गवळ्यांची धावपळ, चालली गोठ्यामध्ये त्या चारा, कडबा गवताच्या,  गंजी तेथे होत्या अधूनी-मधूनी कुणीतरी, झाडती कचरा शेण मातीचा होई तेथे,  सतत पसारा उग्र दर्प दरवळत होता, त्या परिसरी कोंदटलेले वातावरण उबग आणि उरी […]

झीज

रात्रंदिनी कष्ट करूनी,  झिजवत होता आपले हात, जीवनांतल्या धडपडीमध्यें,  दिसे त्याची स्थितीवर मात….१ पर्वा नव्हती स्व-देहाची,  झिजवत असता हात ते जाण नव्हती परि ती त्याला,  हेच कष्ट ते जगवित होते….२, श्रम आणि भाकरी मिळूनी,  ऊर्जा देई तिच शरिराला ऊर्जेनेच तो देह वाढवी,  समाधान जे मिळे तयाला…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

तृप्त मन

एक भिकारी लीन-दीन तो,  भीक मागतो रस्त्यावरी फिरत राही एकसारखा,  या टोकाहून त्या टोकावरी, ।।१ दिवस भराचे श्रम करूनी,  चारच पैसे मिळती त्याला पोटाची खळगी भरण्या,  पुरून जाती दोन वेळेला ।।२ मिठाई भांडारा पुढती,  उभा ठाकूनी खाई भाकरी केवळ मिठाईचा आस्वाद,  त्याच्या मनास तृप्त करी  ।।३ देहाखेरीज कांहीं नव्हते,  त्याचे ‘आपले’ म्हणण्यासाठी परि समाधानी वृत्ती असूनी, […]

निनावी गुरू

नव्हतो कधीही चित्रकार,  परि छंद लागला रंगाच्या त्या छटा पसरवितां,  मौज वाटे मनाला…१, रंग किमया बदण्या नव्हता,  मार्गदर्शक कुणी गुरुविना राहते ज्ञान अपूरे,  याची खंत मनी…२ नदिकाठच्या पर्वत शिखरी,  विषण्ण चित्त गेलो मन रमविण्या कुंचली घेवून,  चित्र काढू लागलो…३ निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,  रंग छटा शिकवी गुरू सापडला चित्र कलेतील,  हाच तो निवावी….४   डॉ भगवान नागापूरकर […]

स्वभाव मालिका

रक्तातुनी गुण-दोष उतरतो,  वंश परंपरेने व्यक्तीतील स्वभाव धर्म,  जाणता येतो रक्ताने…१, मनांतील विचार मालिका,  कृत्य करण्या लाविती सभोवतालच्या परिस्थिती रूपे,  रक्ताला जागविती…२, कर्म फळाच्या लहरींना,   रक्त शोषून घेई, ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी,  बिजे उत्पन्न होई….३, बिजांचे मग रोपण होवूनी,  नव जीवन येते स्वभाव गुणांची मालिका,  अशीच पुढे जाते…४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

आनंदमय जाग

हलके हलके निशा जावूनी,  उषेचे ते आगमन होई निद्रेमधल्या गर्भामध्यें,  रवि किरणांची चाहूल येई…१, त्या किरणांचे कर पसरती,  नयना वरल्या पाकळ्यावरी ऊब मिळता मग किरणांची,  नयन पुष्पें फुलती सत्वरी…२, जागविती ते घालवूनी धुंदी,  चैत्यन्यमय जीवन करी हा जादूचा तो स्पर्श असूनी,  न भासे ही किमया दुजापरी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४९७९८५०  

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो,  त्यांना माहीत नव्हते सहजपणे सुचणारे,   संभाषण ते असते….१, शिक्षण नव्हते कांहीं,  अभ्यासाचा तो अभाव परि मौलिक शब्दांनी,  दुजावरी पडे प्रभाव…२, जे कांहीं वदती थोडे,  अनुभवी सारे वाटे या आत्म्याच्या बोलामध्ये,  ईश्वरी सत्य उमटे….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..