नवीन लेखन...

अमेरिकेतील वृक्ष-वेली..

अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र आहे. म्हणजे डॉलरला जगाच्या बाजारात किंमत आहे. हे जरी खरे असले तरी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात काही निर्माण होत असेल असे वाटत नाही. कॅलिफोर्नियासारख्या भागात शेती, द्राक्ष, बदाम, भाजीपाला आणि कोंबड्या, गाई, मेंढ्या, बोकड यांची निपज, वाढ आणि विक्री (त्यासाठी मोठमोठी कुरणं, slaughtering houses) मोठ्या प्रमाणात असली तरी नानाविध लहानमोठे कपडे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोटारी बहुतेक वेळा परदेशांमधूनच येतात. […]

अमेरिकेतील ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग

अमेरिकेत एप्रिलमध्ये “ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग वीक (driving and texting week)” पाळला जातो. यासंबंधी मुलाने माहिती दिली ती फार उद्बोधक असल्याने आणि मी ती आपल्यापर्यंत पोहोचवावी असे त्याने सुचवल्याने इथे लिहीत आहे. […]

हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस् आणि बोटॅनीकल गार्डनस्

लॉस एन्जीलीसजवळ प्रसिध्द ‘हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस आणि बोटॅनीकल गार्डनस्’ ही वास्तू कित्येक मैलांवर पसरलेली आहे. १९१९ च्या सुमारास हेनरी ई. हंटिंगटन यांनी ती तयार केली. हंटिंगटन हे दक्षिण कॅलिफोर्नियातील एक विख्यात उद्योगपती होते. दुर्मिळ पुस्तकं, कला आणि वनस्पती यामध्ये त्यांना विलक्षण रस होता. […]

१७ माईल ड्राईव्ह

‘१७ माईल ड्राईव्ह’ हा कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळून जाणारा रस्ता आहे. याचे वैशिष्ट्य असे की, तो लांबवर पसरलेला, वळणावळणाने जाणारा असून त्याच्या एका बाजूला फेसाळणारा समुद्र. कधी स्पष्ट, स्वच्छ दिसणारा तर कधी आडव्या, वेड्या वाकड्या, उंच झाडांच्या मागून लपंडाव खेळणारा. समुद्रकिनाऱ्यावर अतिशय शुभ्र वाळू (snow white sand). किनारेदेखील सरळरेषेत नाहीत. कधी ते जमिनीच्या आत घुसलेले. कधी जमिनीचा चिंचोळा भाग समुद्रात घुसलेला. […]

सोनोमा शहर

सोनोमा हे सॅनफ्रन्सिस्कोपासून तासाभराच्या अंतरावर असलेले एक शहर. कॅलिफोर्नियाच्या या भागात अनेक ठिकाणी द्राक्षाचे मळेच्या मळे आहेत. त्यामुळे इकडे अनेक वायनेरीज आहेत. द्राक्षापासून ‘वाईन’ हे मद्य बनविले जाते. असे कारखाने असतात तिथे त्याच्या विक्रीची दुकाने असतात. त्यांना वायनरीज म्हणतात. […]

मौरवुडस् नॅशनल पार्क

फ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते. […]

आरवाईन ते फ्रीमाँट : एक प्रवास

सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते. […]

सोल्वांग

एका शनिवारी आम्ही सोल्वांगला जायला निघालो. लॉस एंजलीसपासून उत्तरेला दीड-दोन तासांच्या अंतरावर समुद्रकिनारी सांता बार्बाराजवळ हे शहर आहे. […]

कॅलिफोर्निया

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्निया हे राज्य वसलेले आहे. यात उत्तरेला सॅनफ्रान्सिस्को तर दक्षिणेला मेक्सिकोची सीमा चिकटली आहे. पश्चिमेला पॅसिफिक महासागर. यात लॉस एंजलीस, सांता बारबारा, आरवाईनसारखी शहरे. […]

बेएरिया

सॅनफ्रन्सिस्कोच्या दक्षिणेला काही मैलांवर सॅनहोजे, फ्रिमाँट, डब्लिन, लिव्हरमोर, प्लेझंटन ही शहरे येतात. पॅसिफिक महासागर आणि सॅनफ्रान्सिस्को बे हे दोन्ही समुद्रकिनारे असल्याने इथली हवा आपल्या मुंबईकडे असते तशीच असते. पण इथले हवामान लहरी आहे. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..