नवीन लेखन...

सैनिकाच्या मुलाची दिवाळी

१. दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी […]

शास्त्रीबुवा

झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत. पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत. त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते. लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत. त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव […]

निस्सीम प्रेम

नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या […]

व्यवस्थेचे गुलाम

१. कर्नल सावंत निवृत्त होणार होते. आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता. सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो. सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते. अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, […]

प्रेमाची परीक्षा

अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते. अभिनय आणखी तीन चार दिवसांनी आपल्या गांवी जाणार होता. […]

आप्पांचा वानप्रस्थाश्रम

आप्पांची सहचारीणी, माई, सोडून गेल्याला दोन महिने झाले होते.
आप्पांनी आपला बेत सर्वांना सांगायचा निश्चय केला. आप्पा ६७ वर्षांचे होते आणि माई त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान. त्या गेल्या त्या दिवसापासूनच आप्पांचे मन संसारावरून उडाले. घर भरलेले होते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..