कावळे (कथा) – भाग 4
वासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू […]