किशोरची ‘किमया रोबोटिक्स’
झूम मिटिंग संपवून किशोर आपल्या आलिशान केबिन मधील खुर्चीत विसावला. गेल्या महिन्या दोन महिन्यात जगात खूप उलथापालथ घडली होती आणि त्याचे परिणाम साऱ्यांनाच भोगायला लागत होते. किशोरची ‘किमया रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ ही मुख्यत्वेकरून ऑटोमोबाईल च्या क्षेत्रात काम करणारी कंपनी सुद्धा त्याला अपवाद नव्हती. शून्यापासून प्रवास करून तो येथवर पोहचला होता. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती च्या बळावर आतापर्यत त्याने जे स्वप्न पाहिले होते ते यशस्वी करत आणले होता. […]