नवीन लेखन...

आयुष्य

तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी, प्यावे तरी मरणार,  नाही प्यावं तरी मरणारचं समस्या ही जन्मभर राहीलीचं ना झोप झाली पूर्ण आणि स्वप्नेही अधुरी. आयुष्यात हवे असते बरंच काही, पण कळलं जेव्हा मिळालंय मला जितकं तितकंही , काहींच्या नशिबात नाही तेंव्हा तक्रार कांही राहीली नाहीं. -गिरीश.

खरे श्रीमंत

आनंद मोजता येत नाही जवळ असलेल्या नोटांमध्ये श्रीमंती मोजता येत नाही आलिशान फ्लॅटच्या भव्यतेमध्ये किती ही पैसा असला तरी तो कमीच भासतो दुसऱ्याचा महाल बघून आपला फ्लॅट छोटा वाटतो दुःख भोगल्यावर कळतं की सुख काय असतं दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की कळतं आपण खरं तर किती श्रीमंत असतो — दिप्ती गोगटे

मनातुरता

क्षिणले स्वर आता थकलेली ही लोचने जाहली कातरवेळा वाटते तुजला भेटावे ।।१।। बिंब ते तेजाळलेले सांजेस गुलमुसलेले गगनही अंधारलेले वाटते तुजला भेटावे ।।२।। उचंबळलेल्या भावना मिठीस आसुसलेल्या शिथिल सारीच गात्रे वाटते तुजला भेटावे ।।३।। क्षितीजी रंग केशरी सत्यप्रीत ती आगळी मन स्मरणात गुंतलेले वाटते तुजला भेटावे ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८० १९ – ६ – […]

कृष्णरूप

राऊळी, गाभारी नयन मी मिटलेले अंतरंग उजळलेले भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।। रूपडे निळेसावळे कृपासिंधू, कृपाळू ओढ नित्य अनावर भान माझे हरपलेले ।।२।। क्षणक्षण पुण्यपावन भक्तीत रंगगंधलेला ध्यानमग्न मीराराधा कृष्णरूप तेजाळलेले ।।३।। रूप लडिवाळ लाघवी अंतरी साक्ष दयाघनाची निरांजनी दिपवी ज्योत श्वास सारे सुखावलेले ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ७९ १८ – ६ – २०२१.

बाप

आधार निश्चीन्ततेचा वटवृक्षाचीच सावली साथ शाश्वत निर्भयी सोबत सुखदुःखातली ।।१।। मूक, करडे आभाळ सांत्वनी, आधार हात फक्त निस्वार्थीच दाता जीवनाला सावरणारा ।।२।। हाच खरा भगवंत जगी कृपाळू, कृपावंत सदा घडविणारा, जगविणारा पुजावा, भजावा अंतरी ।।३।। वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८३. २० – ६ – २०२१.

फक्त एका दिवसासाठी : Independence day

मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त “फक्त एका दिवसासाठी” हि कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

आठवले मला 

माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.

मराठी माणूस

मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ……..कुणी म्हणतसे …….त्याला खेकडा ………तर कुणी म्हणे ……..हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ……….व्यवहार करताना ……….भावनेला तो मध्येमध्ये आणि ……….फायद्याच्या गोष्टींवर ……….सोडून देई पाणी भावना जेव्हा आड येई तेव्हा पैसा त्याचा जाई पैशाला पैसा खेचतो याची जाण त्याला […]

मुर्तीतल्या देवा

मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव || मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव बाहेर समित्या साधती आपलाच डाव || माणसाला किती रे ही संपत्तीची हाव नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव || मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव || मनी नाही भाव तरी देवा मला पाव अशा […]

दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।। निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।। मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार ।।२।। मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..